26 September 2020

News Flash

अमरावतीजवळील बेलोरा विमानतळाची उभारणी विमानपत्तन प्राधिकरणाकडे

अमरावतीजवळील बेलोरा विमानतळ विकासासाठी ३३६ हेक्टर जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणास (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी) देण्याचा निर्णय घेण्यात आला.

| February 18, 2014 07:00 am

अमरावतीजवळील बेलोरा विमानतळ विकासासाठी ३३६ हेक्टर जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणास (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी) देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी हे विमानतळ महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत विकसित करण्यात येणार होते.
प्रस्तावित विमानतळ भारतीय विमानपत्तन प्राधिकरण स्वत:च्या खर्चाने विकसित करणार असून, तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची अट असेल. विमानतळाची धावपट्टी ए-३२० प्रकारची विमाने उतरविण्यासाठी वापरण्यात येईल. तसेच या ठिकाणी नाईट लँडीग फॅसिलिटी, टॅक्सी-वे या सुविधाही असतील. सध्याच्या धावपट्टीचा विस्तार २५०० मीटरपर्यंत करण्यात येईल.
पुढील अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाचे विमान, हेलिकॉप्टर, हेलिअ‍ॅम्ब्युलन्स आणि इर्मजन्सी ऑपरेशन म्हणून विमाने व हेलिकॉप्टर विमानतळावर उतरविताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच विमानतळासाठी दिलेल्या जमिनीचा कुठलाही अन्य वाणिज्यिक वापर केला जाणार नाही. त्याचप्रमाणे बांधा, वापरा, हस्तांतरण या माध्यमातून देखील विकास केला जाणार नाही. ही जमीन प्राधिकरणास ६० वर्षांच्या कालावधीकरीता दरमहा एक लाख रुपये भाड्याने देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 7:00 am

Web Title: belora airport development project
Next Stories
1 अंजली दमानिया यांची अखेर खा. संचेतींविरुद्ध पोलिसांत तक्रार
2 जागावाटपावरून ‘आप’मध्येही धूसफूस
3 बोलेरो-ट्रकच्या धडकेत सात ठार
Just Now!
X