पायात काटा रूतला की डोळ्यात पाणी येते,अशा काट्यांनारच कोणी उघडे झोपले, अशी कल्पना केली तरी अंगावर शहारे येतील.मात्र निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उठलेल्या वादळात त्यांच्या समर्थनांत बीड जवळील तांदळवाडी येथील महादेव मंदिरातील भगवान महाराज यांनी चक्क बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना सुरू केली. उद्यापर्यंत प्रशासनाला यांची कसलीच माहिती नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

बीड पासून 22 किलोमीटर अंतरावरील तांदळवाडी गावातील महादेव मंदिरात, गतवर्षी याच महाराजांनी पाऊस पडू दे म्हणून झाडावर स्वतःला टांगून घेऊन साधना केली होती. आता चक्क इंदुरीकर यांना त्रास झाला म्हणून बाभळीच्या टोकदार काट्यावर निद्रस्त होऊन साधना सुरू केली. भगवान महाराज हे मूळचे लिंबारुई या गावातील असुन त्यांचा बारा वर्षांचा तप आहे. गेल्या दोन वर्षांपासून तांदळवाडी येथील संगमेश्वर संस्थानात ते वास्तव्यास आहेत. इंदुरीकर यांच्या टीकेवरून वांदग उठले आहे. अध्यात्म धोक्यात आल्याचं सांगत भगवान महाराज यांनी अशी कठोर साधना सुरू केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. इंदुरीकर यांनी मंगळवारी पत्र प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही अध्यात्मावर डाग नको, म्हणून ही साधना सुरू असल्याचे भगवान महाराजांनी सांगितले आहे. मात्र ही खडतर साधना पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

इंदुरीकर महाराजांचा माफीनामा

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.