31 May 2020

News Flash

‘कृषिमूल्य न्यायाधिकरणा’साठी भालचंद्र नेमाडे, श्रीहरी अणे अनुकूल

शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे समाधान केवळ ‘कृषिमूल्य न्यायाधिकरणा’ची स्थापना केल्यानेच होणार आहे

भालचंद्र नेमाडे

शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे समाधान केवळ ‘कृषिमूल्य न्यायाधिकरणा’ची स्थापना केल्यानेच होणार आहे आणि तशी तरतूद संविधानाच्या ३२३ ब (२)(ग) कलमात स्पष्टपणे केलेली आहे’, अशी भूमिका आपल्या पुस्तिकेतून मांडणाऱ्या अ‍ॅड.अजय तल्हार यांच्या सूचनेची दखल घेत राज्याचे माजी महाधिभक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी अ‍ॅड. तल्हार यांना पत्र लिहून त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनीही अ‍ॅड. तल्हार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.
अ‍ॅड. तल्हार यांनी ही माहिती देतांना सांगितले की, अ.भा. किसान महासंघाचे अध्यक्ष अनिल कुळकर्णी यांनी आपली औरंगाबादला भेट घेऊन घटनात्मक तरतुदीची अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातही याच न्यायाधिकरणाचा उल्लेख करून शेतकरी या विषयावर सहा पाने लिहिली आहेत. कर्जमुक्ती, कर्जमाफी, कर्जवसुलीत सवलत, जोडधंदा, सबसिडी इत्यादी कोणतेही उपाय केले तरी शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाही अथवा शेतकरी आत्महत्यांचा चढता आलेखही खाली येणार नाही. शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे समाधान केवळ ‘कृषिमूल्य न्यायाधीकरणी’ची स्थापना केल्यानेच होणार आहे आणि अशी न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद संविधानाच्या ३२३ ब (२)(ग) कलमात स्पष्टपणे केलेली आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील अ‍ॅड.अजय तल्हार यांनी लिहिलेल्या ‘कृषी कल्याण : राष्ट्र कल्याण’ या पुस्तिकेत केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहीत शाह यांनी या पुस्तिकेला प्रस्तावना लिहिली आहे. अ‍ॅड. अजय तल्हार यांनी सांगितले की, अ‍ॅड. श्रीहरी अणे, भालचंद्र नेमाडे, न्या. मोहीत शहा, डॉ. श्रीपाल सबनीस, गणेश पाटील, अनिल कुळकर्णीसारख्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी व विद्वानांनी असे न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या विचारांना अनुकूलता दर्शविल्याने आपल्याला या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, आज ना उद्या या विषयाची शासनाला दखल घ्यावीच लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 2:04 am

Web Title: bhalchandra nemade shrihari aney
टॅग Shrihari Aney
Next Stories
1 राहटी बंधाऱ्यातून पाण्याचा अपव्यय
2 ‘सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बंदर व्हावे’
3 जयंती कार्यक्रमात नक्षलवाद्यांचा गोळीबार
Just Now!
X