01 October 2020

News Flash

भंडाऱ्यात पालकमंत्र्यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

स्मारकाच्या नियोजित जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण हटवावे, अशी भेदे यांची मागणी होती.

भंडारा येथे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सरकारी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

भंडारा येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अरुण भेदे असे या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव असून अतिक्रमणाविरुद्ध कारवाई होत नसल्याने त्यांनी हा प्रयत्न केला.

भंडारा येथे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सरकारी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. बावनकुळे यांची सभा सुरु असताना भाजपाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अरुण भेदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

भंडारा येथील भगत सिंग वॉर्डात महात्मा फुले यांचे स्मारक होणार असून स्मारकाच्या नियोजित जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण हटवावे, अशी भेदे यांची मागणी असून अतिक्रमण हटवले नाही तर आत्मदहन करु असा इशारा भेदे यांनी दिला होता. शुक्रवारी दुपारी सभा सुरु असताना भेदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच भेदे यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 5:01 pm

Web Title: bhandara bjp ex corporator tries to commit suicide in front of guardian minister chandrashekhar bawankule
Next Stories
1 पाकिस्तानमें इंदिराजीके समयवाला सन्नाटा चाहिये- भुजबळ
2 Bhima koregaon case: आनंद तेलतुंबडे यांना २७ फेब्रुवारीपर्यंत दिलासा
3 गडचिरोली पोलिसांसाठी हेलिकॉप्टर खरेदी, राज्याच्या गृह मंत्रालयाचा निर्णय
Just Now!
X