21 November 2019

News Flash

भीषण अपघात! भंडाऱ्यात ट्रॅक्स टॅक्सी नदीपात्रात कोसळून सहा जणांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात साकोली-लाखांदूर मार्गावर मंगळवारी दुपारी काळया पिवळया ट्रॅक्स टॅक्सीला भीषण अपघात झाला.

भंडारा जिल्ह्यात साकोली-लाखांदूर मार्गावर मंगळवारी दुपारी काळया पिवळया ट्रॅक्स टॅक्सीला भीषण अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

धर्मपुरी येथील चुलबंद नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरुन ट्रॅक्स टॅक्सी जात असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व टॅक्सी नदीपात्रात कोसळली. टॅक्सीमध्ये एकूण बाराजण होते.

त्यातील सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून जखमींना साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे.

First Published on June 18, 2019 6:53 pm

Web Title: bhandara trax taxi accident bridge falls in river dmp 82
Just Now!
X