19 January 2021

News Flash

आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची आत्महत्या

सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आरमोरीचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाने त्यांच्याच देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. भास्कर चौके (३५) असे त्याचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी भास्कर चौके हा मोटारसायकलने आमदार कृष्णा गजबे यांच्या देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात आला. या वेळी कार्यालयाला कुलूप होते.  प्रवेशद्वारासमोरच त्याने रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. गोळीचा आवाज येताच समोरील पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आमदार गजबे यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यांनी लगेच आमदार गजबे यांनाही माहिती दिली.

या संदर्भात आमदार गजबे म्हणाले, आपण गुरुवारी पक्षाच्या बैठकीसाठी नागपूरला गेलो होते. पोटगाव येथील एका व्यक्तीचे निधन झाल्याने मी माझे कुटुंबीय व अंगरक्षकास अंत्ययात्रेसाठी जाण्यास सांगितले होते, मात्र अंगरक्षक भास्कर चौके हा अंत्ययात्रेस गेला नाही.

आपण रात्री ११ वाजता गावी परतलो. शुक्रवारी सकाळी त्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली. ही अत्यंतदुर्दैवी घटना आहे. तो सकाळी मोटारसायकलने एका महिलेला घेऊन कार्यालयात आला. त्याच्यासोबत ती महिलाही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली, मात्र त्याने गोळी झाडताच ती रडत खाली उतरून बाहेर गेली. तिला बाहेर पडताना काही जणांनी बघितले आणि नंतर तिला पकडून आणले. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2017 2:25 am

Web Title: bharatiya janata party mla krishna gajbes bodyguard shoots self
Next Stories
1 तक्रारीनंतरही पोलिसांचे दुर्लक्ष
2 संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर तूर उधळली
3 राणेंकडून गडकरी-फडणवीसांची स्तुती
Just Now!
X