News Flash

“होर्डींगच्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या….”,अतुल भातखळकरांचा काँग्रेसला टोला

काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमावरुन केलं खोचक ट्विट

अतुल भातखळकर नेहमीच आपल्या ट्विट्समुळे चर्चेत असतात.

सध्या काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या होर्डींगचा फोटोही सध्या व्हायरल होत आहे. या उपक्रमावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. एवढ्या पैशात ५० छत्र्या आल्या असत्या म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

कांदिवली पूर्व मतदारसंघातले भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंगच्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या.”
पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याच उपक्रमामुळे भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.


पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने या उपक्रमाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आलं होतं. यासंदर्भात शहरात काही ठिकाणी याचे पोस्टर देखील लागले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

आणखी वाचा- PHOTOS : पुणेकरांसाठी काँग्रेसचा मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम

पहिल्याच दिवशी पुणेकरांनी काँग्रेस भवनात आपल्या बिघडलेल्या छत्र्या घेऊन दुरुस्तीसाठी मोठी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. १७ जून ते १९ जून पर्यंत सकाळी ११ ते ६ या वेळात काँग्रेस भवनात नागरिकांना आपल्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याने या उपक्रमाद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:37 pm

Web Title: bhartiya janata party mla atul bhatkhalkar criticizes free umbrella repair program of congress party in pune vsk 98
Next Stories
1 Maharashtra Unlock : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध होणार शिथिल?
2 शिवसेना सर्टिफाईड गुंड असल्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
3 Covid 19: महाराष्ट्रात पुढच्या दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती
Just Now!
X