News Flash

भारताला म्लेंच्छ, आंग्ल आणि गांधी बाधाचा रोग-भिडे गुरुजी

मोर्चावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता.

एनआरसी, सीएए कायद्याच्या समर्थनार्थ सांगलीत शिवप्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाची सांगता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेने झाली.

सांगली : भारताला म्लेंच्छ, आंग्ल आणि गांधी बाधाचा रोग झाला असून याच रोगातून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध होत असल्याची टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी सांगलीत केली. हजारो वर्षांच्या पराभूत मानसिकेमुळे हिंदूंच्या मनात वंध्यत्व अपार भरलेले असल्याचेही सांगत त्यांनी यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचारच नवे रक्त तयार करेल असा आशावादही व्यक्त केला.

एनआरसी आणि सीएए कायद्याला समर्थन देण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज मोर्चाचे आयोजन केले होते. राममंदिर येथून निघालेल्या मोर्चाची सांगता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाली. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, दीपक शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे  जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे आदींसह शेकडो तरूण सहभागी झाले होते. शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेमध्ये प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी प्रास्ताविक केले. तर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, खा. संजयकाका पाटील, महापौर संगीता खोत आदींची यावेळी भाषणे झाली.

मोर्चावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. मोच्रेकऱ्यांनी हातात भगवे ध्वज घेतले होते. राम मंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन रोड, कापड पेठ माग्रे मारूती रस्त्यावरील शिवाजी महाराज पुतळा असा मोर्चाचा मार्ग होता. मोर्चाच्यावेळी या मार्गाला जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 3:06 am

Web Title: bhide guruji march in support of nrc and caa zws 70
Next Stories
1 शिवसेनेला रत्नागिरीत दुहेरी आनंद मात्र सिंधुदुर्गात धक्का
2 गडाख, तनपुरे घराण्यात प्रथमच मंत्रिपद!
3 भाजपमध्ये असतानाही विखे विरुद्ध सारे असाच सामना
Just Now!
X