News Flash

भिडे गुरुजींचा आंबा, सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या बोंबा

सर्व स्तरातून आरोप-प्रत्यारोप

माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यास अपत्यप्राप्ती होईल या वक्तव्याने संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. नाशिकमध्ये एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. काही वेळाने त्यांनी असे वक्तव्य केले नसून ते उदाहरणादाखल वेगळ्या अर्थाने सांगितले होते असे स्पष्टीकरण भिडे गुरुजींच्या समर्थकांनी दिले होते. मात्र या सगळ्या प्रकरणावर नेटीझन्सनी भलत्याच बोंबा ठोकल्या असून सोशल मीडियावर आंब्याचा विषय जोरदार गाजला आहे.

यावरचे अनेक जोक्स आणि मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 • प्रेयसीची धमकी….लग्न करतोस की आंबा खाऊ? हा आहे.
 • लग्न न केलेल्यांनीही आंबे खावेत का असा प्रश्नही काहींनी विचारलाय.
 • आंबे खा आणि अपत्य जन्माला घाला भिडे गुरुजींचा नवा कानमंत्र.
 • बाबा रामदेव आणि भिडे गुरुजींनी एकत्रितपणे आंब्याचा व्यवसाय सुरु करावा असा सल्ला काहींनी दिला आहे.
 • तर फणसाच्या सिझनमध्ये आंब्यांना मागणी वाढली आहे.
 • आंबे खाऊन बा होता येत नाही, आणि पगडी बदलून ज्योतिबा होता येत नाही ! अशा भिडे गुरुजी आणि शरद पवार यांना टोला लगावणाऱ्या गोष्टीही काही जण आपल्या फेसबुक किंवा ट्विटरवर पोस्ट करत आहेत.
 • कालपासून विशिष्ट प्रकारच्या आंब्याला (भिडे आंबा) खूप भाव आला आहे.
 • मी रामदेव बाबा पहिला होता
  हा तर “आम”देव बाबा निघाला
  इति भिडे गुरुजीय नमः
 • पुरुषांनो भूतलावर नीट रहा या पुढे; तुमची गरज संपली बरं का! भिडे आंबे बाजारात लाँच झालेत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:20 pm

Web Title: bhide gururji shivpratishthan amba comment viral post on social media
Next Stories
1 Kim Jong un bodyguards : असे निवडले जातात किम जोंग उनचे बॉडीगार्ड
2 जाणून घ्या कंपनीच्या ‘अलीबाबा’ या नावामागील गोष्ट
3 समस्या सांगणाऱ्या पत्रकाराला पियुष गोयल यांची एक दिवस रेल्वे मंत्री बनण्याची ऑफर
Just Now!
X