24 May 2019

News Flash

पुस्तकांचे गाव उद्यापासून खुले

या पुस्तकांवर अनुक्रमांक टाकून पुस्तक शोधण्याची अद्ययावत व्यवस्था झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; भिलार परिसरात वातावरणनिर्मिती

निसर्ग आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणारं महाबळेश्वरजवळील ‘भिलार’ जगाच्या नकाशावर भारतातील पहिले ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून नवी ओळख घेऊन येत आहे. जगाच्या पाठीवरील मराठी भाषेच्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजता भिलार येथे होणार आहे.

या पुस्तकांच्या गावामध्ये पंचवीस घरांत आणि सार्वजनिक जागांत पुस्तकांचा ‘वाचनानंद’ घेण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे. त्या त्या घरांमध्ये पुस्तके पोहोचली आहेत. या पुस्तकांवर अनुक्रमांक टाकून पुस्तक शोधण्याची अद्ययावत व्यवस्था झाली आहे. कुठल्या घरात कोणते पुस्तक आहे, याचे निदर्शक फलक रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत. पुणे-सुरूर-वाई-महाबळेश्वर व सातारा-वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पुस्तकांच्या गावाचे दिशादर्शक फलक रस्त्यावर लावण्यात आले आहेत. रंगरगोटी करून गाव आकर्षक करण्यात आले आहे. नवी ओळख घेऊन जगासमोर जाण्याची तयारी गावकऱ्यांनी मनोमन केली आहे. गावात उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची मोठी वातावरणनिर्मिती झाली आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थ ग्रंथिदडी काढणार आहेत.

सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त विविध साहित्यप्रकारांच्या पुस्तकांचा खजिना, कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्रवासवर्णने असे साहित्यातील सर्व प्रकार वाचकांना येथे आनंद देणार आहेत. अशा भारतातील व मराठी साहित्याच्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवार, दि. ४ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. मुख्यमंत्री स्वत: फिरून पुस्तकांच्या गावाचा अनुभव घेणार आहेत. या वेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ िशदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे िनबाळकर, महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती रुपाली राजपुरे, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, साहित्यिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकत्रे आजूबाजूच्या गावचे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला असून, आकर्षक सभामंडप आणि भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी केले आहे.

First Published on May 3, 2017 2:12 am

Web Title: bhilar country first book town village