शहरी नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टाने २७ फेब्रुवारीपर्यंत दिलासा आहे. तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत हायकोर्टाने तेलतुंबडे यांना कारवाईपासून दिलासा आहे.

एल्गार परिषदेचा तपास करताना नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी तेलतुंबडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

११ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने तेलतुंबडे यांना २२ फेब्रुवारीपर्यंत अटक करण्यात आली तर त्यांची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर लागलीच सुटका करा, असे आदेश दिले होते. यानुसार शुक्रवारी हायकोर्टात पुन्हा एकदा सुनावणी झाली. शुक्रवारी  हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी २७ फेब्रुवारी रोजी ठेवत तोपर्यंततेलतुंबडे यांना कारवाईपासून दिलासा आहे.