19 January 2018

News Flash

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंविरोधात पिंपरीत गुन्हा

सदर गुन्हा शिरुर पोलिसांकडे वर्ग केला जाईल

पिंपरी | Updated: January 2, 2018 5:48 PM

प्रतिकात्मक छायाचित्र

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराप्रकरणी पिंपरीत संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली असून अॅट्रोसिटी आणि अन्य कलमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीतील महिला भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात अडकली होती. पिंपरीत परतल्यावर महिलेने मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून झिरो नंबरने सदर गुन्हा शिरुर पोलिसांकडे वर्ग केला जाईल, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.

पिंपरीतील ३९ वर्षीय महिला बहुजन रिपब्लीकन सोशलिस्ट या पक्षासाठी काम करते. संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, महिला, तिच्या पतीसह आणि लहान मुलांसह भीमा कोरेगाव येथे दुचाकीवरुन जात होती. सणसवाडी, भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात संबंधित महिला अडकली होती. अज्ञात व्यक्तींनी आमच्या समोर लोकांना मारहाण केली, तसेच झेंडे जाळले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेने तिच्यासह आणखी तीन जणांना या हिंसाचाराचा फटका बसला, असे तक्रारीत म्हटले आहे. ४९ वर्षांची महिला व आणखी काही लोक टेम्पोने भीमा कोरेगाव येथे जात असताना जमावाने त्यांच्या टेम्पोवरही हल्ला केला, असे महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

शिवजागर प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि हिंदू जनजागरण समितीचे मिलिंद एकबोटे व त्यांच्या समर्थकांनी हा हिंसाचार घडवला, असा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी एकबोटे व भिडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on January 2, 2018 5:34 pm

Web Title: bhima koregaon violence case registered against sambhaji guruji milind ekbote in pimpri under atrocity act
  1. P
    prashant
    Jan 2, 2018 at 8:03 pm
    ज्यांना या विषयात इंरेस्ट आहे त्यांनी संभाजी भिडे या इसमाच्या नावानी गुगल करून बघावे.
    Reply