25 April 2018

News Flash

भीमा कोरेगाव हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला, या बाहेरच्यांना सरकारने शोधावे-शरद पवार

शेतकरी कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका

शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते याचवेळी शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही ताशेरे झाडले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यथाही शरद पवारांनी त्यांच्या भाषणात मांडली. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा विचार करते आहे. सरकारने आता त्यांचे धोरण बदलण्याची गरज आहे. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल ही गोष्ट सरकारने लक्षात घेतली पाहिजे असेही शरद पवारांनी म्हटले आहे. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टीका केली होती. ४०-४० टन उस उत्पादकांना कर्जमाफी हवी? असा प्रश्न विचारला होता. मात्र शेतकऱ्याची अवस्था खरंच वाईट आहे हे त्यांना ठाऊक नसावे असा टोला शरद पवारांनी संभाजी भिडे गुरुजींचे नाव न घेता लगावला.

सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी देशाचा विकास दर घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेती विकास दर घसरण्याचाही अंदाज व्यक्त झाला आहे. शेतीकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचे धोरण या गोष्टीसाठी कारणीभूत आहे असाही आरोप यावेळी शरद पवारांनी केला.

बँकांची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ८० हजार कोटी रूपये भरले पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना, त्याच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी करताना या सरकारच्या पोटात दुखते. अकलूज येथील महिला वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी ही टीका केली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचीही उपस्थिती होती. नवीन करप्रणाली आणि नोटाबंदी या दोन्ही निर्णयांमुळे देशाची आर्थिक अवस्था बिकट आहे असेही मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.

काँग्रेस राष्ट्रवादीने एकसंघ राहण्याची गरज
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. असे झाले तरच या सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ शकू असेही मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.

First Published on January 7, 2018 3:44 pm

Web Title: bhima koregaon violence was created by outsiders the government should find them says sharad pawar
टॅग Sharad Pawar
 1. A
  Ashok Ingole
  Jan 13, 2018 at 9:46 pm
  baherche mhanje sattebaherche !! raajyat aani kendrat sattebaher aslele lokach asle khel khelat aahet.
  Reply
  1. J
   JaiShriRam
   Jan 8, 2018 at 5:43 pm
   हुकूमशाही वृत्तीच्या अहंकारी लोकांना पवारांनी सांगितलेले हे सत्य पचणार नाही .................. नाहीतर त्यांची दादागिरी कशी चालेल ...
   Reply
   1. पी.डी. जाधव, नालासोप
    Jan 8, 2018 at 10:40 am
    भीमा-कोरेगांव दंगलीत बाहेरच्या शक्तीचा नव्हे दिव्य शक्तीचा हात. त्याचा शोध लावणे आपल्या पोलिस दलाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. त्या साठी बाबा-बुवांची टीम नियुक्त केली पाहिचे. तरच ते आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या साह्याने त्या अदृश्य शक्तीचा शोध लावू शकतील.
    Reply
    1. V
     vinod
     Jan 8, 2018 at 9:56 am
     शिवराम वैद्य पेड रस मनुवादी , आगीशी खेळ तुम्ही करतायेत सावरा स्वतःला जनता हुशार झाली आहे , तुमच्याच वायफाय ने तुमचीच पोलखोल होणार आहे काळजी नसावी
     Reply
     1. U
      ulhas
      Jan 8, 2018 at 12:43 pm
      नावाला जागलात विनोदराव.
      Reply
     2. Nitin Deolekar
      Jan 7, 2018 at 11:09 pm
      आमच्या दलित चळवळीची नेहमीची ठरलेली शोकांतिका सुरु आहे.. पहिला सभेचा आणि दुसरा दंगलीचा अंक तर लई झक्कास झाला. लवकरच आता तिसरा अंक सुरु होईल. दलित नवं-तरुण बाबासारखा अभ्यास करायचे सोडून कोर्टात खेटे टाकतील, आयुष्याची सोनेरी वर्षे वाया घालवतील. काँग्रेसने फेकलेल्या तुकड्यावर जगण्यासाठी आणि मंत्री-पदाचा "मेवा" खाण्यासाठी डझनभर मेवानी खालिद दिल्लीला खेटे घालतील!! नेहरूंच्या नातवाच्या दारात उभे राहून जन्म-भर कुत्र्या-प्रमाणे गोंडा घोलवतील कि काय?? अशी ा भीती वाटतेय.. संघाने निदान एका तरी ओबीसी-ला प्रधान-मंत्री केले..आणि दुसऱ्याला थेट राष्ट्रपती..!! सगळ्यांनी माझे-च विचार मानावेत आणि फक्त मीच खरा असे माझे अज्जीबात म्हणणे नाही!! (कोण-कुण्या खालिद प्रकाश मेवानी-वाणी) बाबांच्याच आदेशानुसार सतत नवा विचार करीत राहणे आवश्यक आहे!! (आणि काळानुसार घटना बदलणे-हि तितुकेच अत्यावश्यक आहे-च!! जसे मुस्लिम-माता-भगिनींना त्यांचे सारे हक्क तर दिलेच पाहिजेत त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे-च.)
      Reply
      1. K
       kudale
       Jan 7, 2018 at 9:22 pm
       तुम्ही भीमा कोरेगाव चे का ?
       Reply
       1. V
        vaaikar
        Jan 7, 2018 at 9:05 pm
        सरकार खाणार्यांचा विचार करते /खाणाऱ्या जनतेचा विचार करणे हे कर्तव्यच आहे ! तुम्ही फक्त खात राहिला !तुमच्या सारखे अजून आगीत तेल ओतत आहेत !गडकरी पुतळ्या पासून हे षडयंत्र चालू आहे !
        Reply
        1. Mangesh Deo
         Jan 7, 2018 at 8:21 pm
         .....हो, पण त्यात आमच्याच इशार्यावर नाचणारी बीगडी धेंडे असतील तर मात्र मग आम्ही चुकीच्या तपासाचा आरोप करायला तयार आहोत हं !
         Reply
         1. A
          anand
          Jan 7, 2018 at 7:51 pm
          एव्हढ्या धैर्याने व ठामपणे शरद पवार का बोलत आहेत ते लक्षात घ्या. त्यांनी कुणा बाहेरच्या माणसांना /संस्थेला तर सुपारी दिली होती का?
          Reply
          1. Shivram Vaidya
           Jan 7, 2018 at 7:46 pm
           ..२..हजारो वर्षे अनेक धर्मांचे, जातीपातींचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याच नेत्यांनी, ब्रिटीशांच्या पूढे चार पावले जाऊन, समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी फोड आणि झोडा ही नीती वापरून देशाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न केला आहे. या राजकीय पक्षांची हीच नीती कायम राहिली, त्यांच्या नेत्यांना असेच मोकळे सोडले गेले, समाजात दुफळी माजवण्याची ही पद्धत सर्व देशात पसरवली गेली तर देशाच्या परंपरांवर, संस्कृतीवर तो मोठाच घात होणार आहे आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरणार आहे. सत्ताप्राप्तीसाठी धर्म-जात-पात-पंथ-भाषा आणि प्रांत या मुद्यांवर राजकीय पक्षांनी प्रचार करण्यास कायद्याने बंदी घातली पाहिजे. हा आगीशी खेळ करून आपण किती वर्षे खेळणार आहोत आणि जनतेचे आयुष्य धोकादायक करणार आहोत ह्याचा विचार गंभीरपणे करण्याची वेळ आलेली आहे.
           Reply
           1. Shivram Vaidya
            Jan 7, 2018 at 7:45 pm
            आगीशी खेळ किती वर्षे? : नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनांचा, जाळपोळीचा, हिंसाचाराचा आणि सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीचा आणि या सर्वांमुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या व्यवहारावर झालेल्या दुष्परिणामांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. दोनशे वर्षांपूर्वी झालेल्या एका घटनेच्या निमित्ताने समाजातील काही असंतुष्ट नेत्यांनी, राजकारण्यांनी, विविध संघटनांनी जातीय विद्वेष पसरवण्याचे काम केले आणि त्याला सोशल मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियानेही बऱ्याच प्रमाणात साथ दिली. मराठी वाहिन्यांवर तर वाहिन्यांचे अनेक सुत्रधारच, समाजातील विविध जातींमध्ये एकी निर्माण करण्याचे काम करण्याऐवजी हे सुत्रधारच एका विशिष्ठ समाजाची बदनामी करून समाजात तेढ वाढवण्यावरच भर देत होते. ब्रिटीशांनी चालवलेली फोडा आणि झोडा ही नीती आपल्या देशातील काही राजकीय पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी, संघटनांनी ी ी उचलून आजही हे पक्ष समाजात धर्म, जात-पात, पंथ, भाषा आणि प्रांत अशा अनेक मुद्यांवर उघडपणे ही नीती वापरून गेली अनेक दशके देशामध्ये सत्तेचे राजकारण करत आहेत. वसुधैव कुटुंबकम हे तत्व मानणाऱ्या आपल्या देशामध्ये गेली ..२..
            Reply
            1. Shivram Vaidya
             Jan 7, 2018 at 7:44 pm
             ..३..माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा ा अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.”. भारताच्या या प्रतिज्ञेचे स्मरण सुद्धा प्रत्येक भारतीयांस देशाप्रतिची निष्ठा बळकट देणारे ठरेल यात शंका नाही.
             Reply
             1. Shivram Vaidya
              Jan 7, 2018 at 7:44 pm
              ..२..समाजात विद्वेष पसरवण्याचे आत्तापर्यंत कितीही प्रयत्न झाले असले तरीही सर्वच समाजातील लोक या कट-कारस्थानाला बळी न पडता आपला मूळ सर्वधर्मसमभावाचा गूणधर्म सोडत नाहीत आणि असे आत्मघातकी प्रयत्न जरी पूढेही झाले तरी ते भविष्यात कधीही सोडणारही नाहीत, हे आपल्या देशाचे एक मोठे वैशिष्ठ्य आहे. मात्र समाजात अधुनमधून अशी दुफळी माजवण्याचा आणि त्यातून आपला राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघातक शक्तींशी समाजानेच आपल्या सर्वशक्तीनिशी सामना केला पाहिजे. अशा शक्तींना देशविघातक, समाजिक अणि धार्मिक ऐक्यासाठीही धोकादायक असलेल्या कृत्यांपासून रोखणे हे देशातील जबाबदार नागरीकाचे कर्तव्य आहे. अशा शक्तींना खतपाणी घालून स्वार्थी राजकारण करणाऱ्या सर्वांनीच या गोष्टीची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक आहे. असे प्रयत्न देशाला कधीही उज्वल भविष्य देऊ शकणार नाहीत तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता, सामाजिक आणि धार्मिक एकता, देशाची सुरक्षितता आणि ऐक्य, कायदा आणि सुव्यवस्था, देशाचा सर्वधर्मसमभाव या सगळ्यासाठीही अत्यंत घातक आहेत. “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या..3
              Reply
              1. Shivram Vaidya
               Jan 7, 2018 at 7:42 pm
               कोरेगाव भीमा प्रकरणाचा धडा : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या प्रकाराचे कोणत्याही दृष्टीने समर्थन करणे केवळ अशक्य आहे. जातीभेदाच्या भिंती विरळ करून जवळपास नष्ट करण्याचा प्रयत्न आपल्या देशात अनेक दशकांपासून होतो आहे. वास्तविक आपल्या देशामध्ये सर्व जाती-धर्मांचे लोक अनंत काळापासून गुण्यागोविंदाने, एकोप्याने राहात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनातही धर्म-जात-पात-पंथ-भाषा-प्रांत अशा जुलमी बंधनांचा अडसर कधीही येत नाही. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे, एकमेकांच्या सुख-दु:खामध्ये भागी होणे, एकमेकांना अडी-अडचणीमध्ये यथाशक्ती मदत करणे, एकमेकांच्या धार्मिक समारंभामध्ये सामील होणे या गोष्टी समाजात एवढ्या जतेने होतात की त्यात आपण काही विशेष करत आहोत अशी भावनाही कोणाच्या मनात येत नाही. भारतीय संस्कृतीमधील विविधतेमधील ही एकता जगातील अनेक देशांना बुचकळ्यात टाकते आहे. आपल्या देशाच्या या संस्कृतीचे, परंपरांचे आणि एकूणच भारतीयांच्या सर्वसमावेशक स्वभाव वैशिष्ट्यांचे अवघ्या जगाला कुतुहल आहे. असे असता मधूनच अशा काही दुर्घटना घडतात किंवा घडवल्या जातात की देशाच्या प्रतिमेवर एक काळा डाग पडतो. पण तरीही..2
               Reply
               1. Shivram Vaidya
                Jan 7, 2018 at 6:38 pm
                शरद पवारांनी सांगितले ते सत्य असण्याची शक्यता आहे. भीमा कोरेगाव मध्ये जो वार्षिक कार्यक्रम होत होता तो गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. आत्तापर्यंत तेथे अशा प्रकारची घटना कधीही झाली नव्हती. मात्र याच वर्षी ती नेमकी का झाली? याचे उत्तर प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवानी, उमर खलिद आणि स्वतःला दलित जनतेचे मसीहा समजणारे बुद्रुक, स्वार्थी मनोवृत्तीचे कोते नेते यांच्याशिवाय कोण देऊ शकेल? शनिवार वाड्यावरील एल्गार परिषदेमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे जाहीर आव्हान या दोघांनीही केले होते. तसेच राज्यातील नवपेशवाई (?) नष्ट करण्याचे आव्हानही त्याने केले होते. ही दोन्ही आव्हाने त्यांनी कोरेगाव-भिमा मध्ये आणि नंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये केलेल्या हिंसाचाराने सिद्ध करून दाखवले. दोन हजार कोटींच्या आसपासचे नुकसान, सर्वसामान्य जनतेचे हाल, सार्वजनिक संपत्तीची विधूळवाट करून त्यांनी महाराष्ट्रात दहशत पसरवली. आता जिग्नेश मेवानीला उलटे टांगून मिरच्यांची धुरी दिली तरच तो पोपटासारखे खरे काय आहे ते सांगेल. सरकारने या प्रकरणात सामील असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडता कामा नये !
                Reply
                1. Hemant Kadre
                 Jan 7, 2018 at 6:37 pm
                 बाहेरचे म्हणजे? भारताबाहेरचे की महाराष्ट्राबाहेरचे की पुण्याबाहेरचे? बारामतीतील तर नक्कीच नसावेत कारण साहेब खोटं बोलत नाहीत असा साहेबांचाच दावा असतो.
                 Reply
                 1. Mangesh Keluskar
                  Jan 7, 2018 at 5:47 pm
                  हेच ते बाहेरचे ना
                  Reply
                  1. D
                   dandekar
                   Jan 7, 2018 at 5:39 pm
                   ह्यांच्या पेक्षा पप्पू बरा
                   Reply
                   1. Ajinkya Patil
                    Jan 7, 2018 at 5:28 pm
                    Only pawarsaheb...
                    Reply
                    1. Devidas Bagde
                     Jan 7, 2018 at 5:21 pm
                     अहंकार जर नसेल ?तर काँग्रेस मध्ये मिसळून का जात नाही.
                     Reply
                     1. A
                      Ajit Pada Pawar
                      Jan 7, 2018 at 5:00 pm
                      नौटंकी बंद करा व कोणत्या ब्रिगेडी लोकांनी संघाच्या मदतीने हा प्रकार चिघळवला ते उघडपणे सांगा .
                      Reply
                      1. Load More Comments