20 September 2020

News Flash

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना धमकी देणारा नांदेडचा डॉक्टर अटेकत

भोपाळच्या दहशतवादी प्रतिबंधक पथकाने केली अटक

संग्रहीत

भाजपा नेत्या तथा भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना घातक रसायन लावलेले धमकीचे पत्र पाठविल्याप्रकरणी नांदेडमधील एका डॉक्टरला भोपाळच्या दहशतवादी प्रतिबंधक पथकाने अटक केली.

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील निवासस्थानी 13 जानेवारी रोजी त्यांना धमकावणारे पत्र प्राप्‍त झाले होते. त्या अनुषंगाने भोपाळ दहशतवादी प्रतिबंधक पथकाने तपास सुरू केला होता. या पत्राचे नांदेड कनेक्शन पुढे आल्यानंतर त्यांनी नांदेड एटीएसशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली होती. हे पत्र पाठविणारा डॉ.सय्यद अब्दुल रहेमान मो.उस्ताद रहेमान असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी धनेगाव येथील त्याच्या घरी छापा मारून त्याला अटक केली.

डॉक्टर सय्यद याने इसिस, इंडियन मुजाहिदीन या सारख्या जहाल दहशतवादी संघटनेच्या नावाचा वापर पत्रात केला होता. कौटुंबिक वादातून त्याने स्वतःचा वकील असलेला भाऊ तसेच आईच्या नावाने पत्र पाठविले होते. या मागे त्यांना या प्रकरणात अडकविण्याचा त्याचा प्रयत्न होता असे तपाससात पुढे आले आहे. यापूर्वी त्याच्या बहिणीच्या तक्रारीवरून त्याच्याविरूद्ध इतवारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 7:23 pm

Web Title: bhopal mp sadhvi detains nanded doctor who threatens nck 90
Next Stories
1 सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही – राऊतांचा टोला
2 काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर आम्ही शुद्ध मराठीत बोलतो – संजय राऊत
3 संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह खासदार संजय राऊत यांचे बेळगावात स्वागत
Just Now!
X