सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशन माझ्यासाठी अखेरचे अधिवेशन असल्याची भावना बुधवारी सार्वजनाक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे कोणत्याही राज्याला फेरनिवडणुका परवडणाऱ्या नसून केजरीवाल यांनी दिल्लीत स्वत सरकार स्थापन करावे अथवा भाजपला पािठबा द्यावा असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानी भुजबळांनी भेट दिली. यावेळी जुन्या राजकीय आठवणांना त्यांनी उजाळा दिला.राज्याच्या राजकारणात सुमारे 35 ते 40 वष्रे सक्रीय राहिल्यानंतर भुजबळ यांनी लोकसभेवर जाण्याच्या निर्णय घेतला आहे. पक्षाने मला लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार आपण लोकसभेची निवडणूक लढविणार आहोत. मात्र, कोणत्या मतदार संघातुन लढवणार, याबाबत  हा निर्णय पक्ष घेईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर हे भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीतील एक महत्वाचे केंद्र मानले जाते. याच ठिकाणी त्यांनी तत्कालीन हिवाळी अधिवेशनात शिवसेनेत बंड करीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी लगेच निवडणुका कुणालाच परवडणार नाहीत. त्यामुळे केजरीवाल यांनी विचार करायला हवा असेही भुजबळ यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे राज्यातील टोल धोरणाबाबत नियोजन विभागाचे अप्परम्ख्यु सचिव के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली ही समिती आपला अहवाल न्यायालयाला सादर करणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरच हे धोरण स्पष्ट होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भात केरळच्या धर्तीवर राज्याने कायदा करावा, व मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही भूमिका स्पष्ट केली.