हर्षद कशाळकर

चक्रीवादळाने ९० टक्के पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी

46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा
fire broke out in huts of sugarcane workers
शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग; प्रापंचिक साहित्य बेचिराख

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्य़ातील सुपारी बागांना बसला असून, वादळामुळे जवळपास ८० ते ९० टक्के सुपारीच्या बागा नष्ट झाल्या. भुईसपाट झालेल्या या बागामुळे बागायतदारांचे अपरिमित नुकसान झाले आहेच, पण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

रायगड जिल्ह्य़ात पाच हजार हेक्टर्सवर सुपारीची लागवड केली जाते. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ ते ४० कोटींची उलाढाल होत असते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने सुपारीची लागवड केली जाते. भौगोलिकदृष्टय़ा हा परिसर सुपारीसाठी अत्यंत पोषक आहे.

रायगड जिल्ह्य़ातील किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सुपारीचे पीक धोक्यात आणले आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग येथील ९० टक्के सुपारीच्या बागा वादळाच्या तडाख्याने भुईसपाट झाल्या आहेत. या वर्षीचे पीकही हातातून गेले आहे. वादळाच्या या धक्क्यातून किमान १० वर्षे बागायतदार सावरू शकणार नाही. कारण सुपारीचे एक झाड उत्पादनक्षम होण्यासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागतो, त्यानंतर ते झाड वर्षांकाठी एक ते दीड हजारांचे उत्पन्न देण्यास सुरुवात करते. त्यामुळे वादळग्रस्त बागायतदारांनी आता जरी सुपारीची लागवड सुरू केली तरी, त्यांना प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.

येथील बहुतांश शेतकरी हा अत्यल्प आणि अल्पभूधारक आहे. अशा वेळी कमीत कमी जागेत जादा उत्पादन देणारे पीक म्हणून बागायतदार सुपारीकडे वळला होता. सुपारी लागवडीचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले होते. मात्र चक्रीवादळाने सारेच ठप्प झाल्याचे बागायतदारांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त बागायतदारांना हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत दिली जाते. वादळग्रस्तांना हा निकष लावून मदत दिली गेली तर, बहुतांश बागायतदारांना अडीच ते तीन हजारांची मदत मिळेल. ही मदत अत्यंत अपुरी असेल. नष्ट झालेल्या बागांच्या साफसफाईसाठी मनुष्यबळाची गरज आहे. त्यांच्या मजुरीसाठी किमान १५ ते २० हजारांचा खर्च येईल, त्यामुळे नुकसानभरपाईपेक्षा साफसफाईचा खर्चच जास्त असणार आहे. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाईचे निकष बदलायला हवेत, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. नुकसानभरपाई देताना पडलेल्या झाडांच्या संख्या आणि त्यामुळे होणरे दहा वर्षांचे नुकसान, हे लक्षात घेऊन शासनाने मदत द्यावी अशी बागायतदारांनी केली आहे.

रोठा सुपारी म्हणजे काय?

रायगड जिल्ह्य़ातील श्रीवर्धनची रोठा सुपारी ही प्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला चांगली असते. सुंगधी सुपारी आणि पानमसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने या सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते.

चार हजार हेक्टरवरील सुपारीचे नुकसान

वादळामुळे जवळपास साडेचार हजार हेक्टरवरील सुपारीच्या बागांचे नुकसान झाले आहे. या बागांची नव्याने उभारणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सुपारीच्या रोपांची आवश्यकता लागेल. मात्र एवढी रोपे सध्या जिल्ह्य़ात उपलब्ध नाहीत. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून रोपे आणावी लागणार आहेत. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्रात वर्षभर रोपनिर्मितीचे काम सुरू असते. मात्र या संशोधन केंद्रालाही वादळाचा तडाखा बसला आहे.

वादळामुळे नुकसान झालेल्या बागांची नव्याने उभारणी करणे हे मोठे आव्हान आहे. शासनाने बागायतदारांना मदत करणे आवश्यक आहे. सुपारी लागवडीसाठी शासनाने रोप आणि खत उपलब्ध करून द्यावी, फवारणीसाठी औषधपुरवठा करावा. संगोपनासाठी वार्षिक मदतही द्यावी.

– हेमंत दांडेकर, सुपारी बागायतदार,

टाळेबंदीमुळे आधीच सुपारी खरेदी-विक्री बंद आहे. मुरुड सुपारी खरेदी-विक्री संघाकडे सात ते आठ कोटी रुपयांची सुपारी पडून आहे. अशातच आता वादळाने सुपारी बागाच उद्ध्वस्त केल्या आहेत. हे त्याहून मोठे संकट आहे. पुढील दहा वर्षे बागायतदार यातून सावरू  शकणार नाही

– महेश भगत, अध्यक्ष, मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघ

जिल्ह्य़ात १८ हजार हेक्टरवरील फळबागांचे वादळाने नुकसान झाले आहे. यात सुपारी बागायतींचा समावेश आहे. पंचनामे करण्याचे काम पूर्ण सुरू आहे. हे काम दोन दिवसांत पूर्ण होईल. यानंतर शासनाकडे अहवाल सादर केला जाईल.

– पांडुरंग शेळके, कृषी अधीक्षक, रायगड