19 September 2020

News Flash

समाज माध्यमांवरील प्रचार रोखण्याचे निवडणूक यंत्रणांपुढे मोठे आव्हान

देशात इंटरनेट सेवेचे दर कमी झाल्याने, समाज माध्यमांचा वापर करणारयांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. त

हर्षद कशाळकर, अलिबाग 

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा प्रथमच समाज माध्यमांवरही ही निवडणूक आचारसंहिता बंधनकारक असणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने समाज माध्यमांवरून होणारा प्रचार, जाहिराती आणि आक्षेपार्ह मजकूर यांची निवडणूक यंत्रणांमार्फत पडताळणी केली जाणार आहे. पण समाजमाध्यमांचा व्यापक आवाका लक्षात घेतला हे काम मोठे आव्हानात्मक ठरणार आहे.

देशात इंटरनेट सेवेचे दर कमी झाल्याने, समाज माध्यमांचा वापर करणारयांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. तरुण पिढी मोठय़ा संख्येनी समाजमाध्यमांशी जोडली गेली आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अँप, यूटय़ूबसारख्या माध्यमांशी अनेक जण जोडले गेले आहेत. त्यामुळे थेट संवादाचे माध्यम तयार झाली आहे. या माध्यमांचा निवडणूक काळात प्रचारासाठी व्यापक प्रमाणात वापर सुरू झाला आहे. समाजमाध्यमांचा प्रचार माध्यम म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे या समाज माध्यमांवरील प्रचारावर आता निवडणूक आयोगांची नजर असणार आहे. निवडणूक आयोगाने प्रथमच सोशल मीडियासाठी आचारसंहिता लागू केली आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित होणारया मजकुरांची पडताळणी करण्याचे मोठे आव्हान निवडणूक यंत्रणेवर असणार आहे.

पोलिसांचा सायबर सेल, आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नॅशनल इन्फम्रेशन सेंटर सोडले तर निवडणूक यंत्रणेकडे तांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आभाव असणार आहे. अशा परिस्थितीत विविध समाजमाध्यमांवर पडणाऱ्या मजकुराची पडताळणी करणे मोठे आव्हानात्मक असणार आहे. देशात प्रथमच समाजमाध्यमांवर आचारसंहितेचा प्रयोग केला जात आहे. समाजमाध्यमांवर जाहिरात प्रसिद्ध करताना निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र याची माहितीच राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या परवानगी शिवाय अनेक जाहिराती आणि प्रचाराचा मजकूर समाजमाध्यमांवर पडत असल्याचे दिसून येत आहे.

‘ समाजमाध्यमांवर प्रसारित होणारा मजकूर तपासणे, त्याची पडताळणी करणे, बदनामी कारक मजकूर रोखणे, समाजमाध्यमांवरील ध्वनिचित्रफितींची बारकाईने तपासणी करणे यासाठी निवडणूक यंत्रणेला तांत्रिक पाठबळ असण्याची गरज आहे. निवडणूक काळात यूटय़ूबवर प्रसारित होणाऱ्या स्थानिक बातम्या, निवडणूक प्रचार सभा यांच्यावरही नजर ठेवण्याचे मोठे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर असणार आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:17 am

Web Title: big challenge for election commission to stop the election campaign on social media
Next Stories
1 नाविद अंतुलेनी घेतली अनंत गीतेंची भेट
2 सर्व माध्यमे मोदी धार्जिणी
3 कणकवलीच्या छायाचित्रकाराचे जगभरात कौतुक
Just Now!
X