News Flash

लोणंदच्या बाजारात तुफान गर्दी! करोनाचे सर्व नियम पायदळी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड-बकरी खरेदीसाठी झाली गर्दी; अनेक विक्रेते आणि खरेदीदार यांनी मास्कचा वापरच केला नसल्याचे दिसून आले

करोना रुग्ण वाढल्यास साताऱ्यामध्ये पुन्हा अडचणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता.

सातारामधील लोणंद कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या आवारातील शेळी, मेंढी,  बोकड व बकरी बाजारात  बकरी  ईदच्या पार्श्वभूमीवर आज(गुरूवार) तुफान गर्दी झाली होती. टाळेबंदीनंतर बकरी बाजार भरल्याने बाजार समितीच्या आवारात जत्रा भरल्याचे स्वरूप आले होते. आजच्या या बाजारात कोट्यवधींची रूपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोणंद बाजार समिती परिसरातील बकरी व बोकड, जनावरे बाजारासाठी आज पहाटे पाच वाजेपासुनच गर्दी होण्यास सुरूवात झाली होती.  बाजार आवारात दुचाकी, चार चाकी व ट्रकमधुन शेळी, मेंढी, व बोकड आणले जात होते. आजच्या बाजारात बकरी व बोकडांची सुमारे १५ ते २० हजारांपर्यत आवक झाली. आजच्या बाजारात सुमारे तीन ते चार कोटीची उलाढाल होणार असल्याचा अंदाज  लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दतात्रय बिचुकले यांनी वर्तवला होता.

आजच्या बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक, गोवा या राज्यांसह हुबळी, घारवाड, बंगळुरू , कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील सुमारे १५ ते २० हजारांपर्यत खरेदीदार आले होते. तर वाहनांची संख्याही मोठी होती. या बाजारात करोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. अनेक विक्रेते आणि खरेदीदार यांनी मास्कचा वापरच केला नसल्याचे दिसून आले. सुरक्षित अंतराचा लवलेशही नव्हता. बकरी ईदच्या बाजारात सुमारे बकरी व बोकड खरेदी विक्री उलाढालीतुन मोठा सेस बाजार समितीला जमा होईल असे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी सांगितले आहे.

बाजार सुरू झाल्यानंतर हा पहिलाच बाजार समितीच्या आवारातील खुला बाजार होता यामध्ये करोनाचे नियम पूर्णतः पायदळी तुडवले गेल्याचे दिसू आले. यामुळे आता काही अनुचित प्रकार घडल्यास आणि रुग्ण वाढल्यास साताऱ्यामध्ये पुन्हा अडचणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 10:05 pm

Web Title: big crowd in the market at lonand violation of all the rules of the corona msr 87
टॅग : Corona
Next Stories
1 Coronavirus : राज्यात दिवसभरात ८ हजार १० नवीन करोनाबाधित ; १७० रूग्णांचा मृत्यू
2 ‘आयटीआय’साठी प्रवेशप्रक्रिया सुरू ; ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध!
3 कोल्हापूर जिल्ह्यात करोना परिस्थिती गंभीर?; छे, छे… सर्व काही ठीकठाक… केंद्रीय पथकाचा निर्वाळा!
Just Now!
X