राज्यातील धार्मिक स्थळांना पाडव्यापासून उघडण्यास राज्य सरकारच्यावतीने आज परवागी देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः हे जाहीर केले. यानंतर राजकीय वर्तुळातून विशेषकरून भाजपा नेत्याकंडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपा आमदार कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले डरपोक सरकारचा मोठा पराभव! जनतेचा अखेर मोठा विजय! असं रामदास कदम यांनी ट्विट केलं आहे.

या अगोदर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार नितेश राणे यांनी देखील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळ सोमवारपासून सुरू होत असल्याची माहिती देताना, मुख्यमंत्र्यांनी हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं म्हटलं आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास आतापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. या मुद्यावरून भाजपाने आक्रमक धोरण स्वीकारले होते. शिवाय, वारकरी संप्रदायामध्येही सरकारबद्दल नाराजी वाढत होती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मंदिरं उघडण्यासाठी आतापर्यंत भाजपाकडून राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलनं करण्यात आली होती.