औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोटय़वधी रुपयांच्या खरेदी-विक्रीची नोंदी नसल्याने त्यात मोठा अपहार झाल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत दिली.गंगापूरचे प्रशांत बंब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठात कोटय़वधी रुपयांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदीच नसल्याचे लेखा परीक्षण अहवालातून निदर्शनास आले. विद्यापीठातील विविध विभागांनी कार्याच्या नोंदीच न केल्याने अफरातफर झाल्याचा मुद्दा या वेळी पस्थित करण्यात आला. विद्यापीठातील विविध विभागांमार्फत आलेली देयके विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीसह प्रमाणित करण्यात येतात व लेखापरीक्षकांनी तपासणी करूनच देयकांची अदायगी केली जाते, असे उत्तर राज्यमंत्र्यांनी दिले मात्र. यापूर्वीही सात कोटी रुपयांची अफरातफर झाल्याची आठवण करून देत बंब यांनी खर्च दाखवला मात्र त्याची बिले सादर केली नसल्याने विद्यापीठात गैरप्रकार झाल्याचा मुद्दा लावून धरला.