11 December 2017

News Flash

शरद पवारांच्या वाढदिवशी राज्यभर महाआरोग्य शिबीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विश्वविक्रमी

वार्ताहर , लातूर | Updated: November 27, 2012 4:50 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विश्वविक्रमी मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली.
मराठवाडय़ाच्या ८ जिल्हय़ांतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी येथे झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. लातूर जिल्हाध्यक्ष अविनाश रेशमे, धनंजय देशमुख, शंकर गुट्टे, अ‍ॅड. श्रीकांत सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते. राज्यातील सुमारे ७०० ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.  एका केंद्रावर दिवसभरात एक हजार जणांची तपासणीची व्यवस्था केली आहे. शिबिरात नेत्र व मोतीबिंदू, मधुमेह, हृदयरोग, एक्स-रे बालरोग तपासणी, लसीकरण, स्त्रीरोगनिदान व उपचार, मणक्यांचे           आजार आदींची तपासणी करण्यात येणार आहे.  शिबिरात राज्यभरात किमान ७ लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. राज्यात प्रथमच अशा महाशिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले. शिबीर यशस्वितेसाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी १५ दिवसांपासूनच तयारीला लागले आहेत.    
नगर-नाशिकमधील ६० हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त होणार

First Published on November 27, 2012 4:50 am

Web Title: bighealth camps organise on occasion of shard pawar birthday