News Flash

वंचित बहुजन आघाडीची बिहार निवडणुकीत उडी; ‘या’ आघाडीसोबत लढवणार निवडणूक

बिहार विधानसभा निवडणूक २०२०

पीडीएतील नेत्यांसमवेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. (छायाचित्र/वंचित बहुजन आघाडी ट्विटर)

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिहारमधील राजकीय समीकरणांविषयी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राशी संबंधित दोन पक्षांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम पाठोपाठ अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीनंही बिहारची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची २५ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये काय निकाल येतात याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी एमआयएमनं केली होती. त्यापाठोपाठ आज वंचित बहुजन आघाडीनंही बिहार निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

आणखी वाचा- बिहारमध्ये निवडणुकीअगोदर ‘यूपीए’ला झटका;‘रालोसपा’ने साथ सोडली!

“बिहार विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीत अन्य पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आघाडीच्या माध्यमातून एनडीएच्या अमानवी सरकार सत्तेवरून हटवून मानतावादी सरकार स्थापन करू,” असा विश्वास वंचित आघाडीनं व्यक्त केला आहे.

“बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष व प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्सचे समन्वय राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्यासोबत लढणार आहोत. यशवंत सिन्हा व काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही एनडीएचं सरकार दूर करू,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

आणखी वाचा- गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूमध्ये पक्षप्रवेश, विधानसभा निवडणूक लढवणार

बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 2:56 pm

Web Title: bihar assembly election bihar vidhansabha nivadnuk 2020 prakash ambedkar vanchit bahujan aghadi bmh 90
Next Stories
1 “इथे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पैसा नाही आणि सरकारने करदात्यांचे ८४५८ कोटी रुपये विमानावर खर्च केले”
2 निर्भया प्रकरण: …जाब विचारणाऱ्या ‘त्या’ संतप्त तरूणींना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिंदे म्हणाले,…
3 हाथरस : तृणमूलच्या नेत्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखलं; पोलिसांकडून धक्काबुकी
Just Now!
X