अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षा नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ६ मार्च रोजी अलिबाग येथे बाइक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. पिस्क्वेअर एज्युस्पोर्ट्स फाऊंडेशन, मुरुडच्या ‘बाइकर्स ऑफ मुरुड’ या क्लबद्वारे सदर रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. वाहन चालवताना स्वत:च्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे तसेच रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत समाजात योग्य संदेश पोहचवणे आवश्यक आहे. समस्त अलिबागकर तसेच पेण, रोहा, मुरुड येथील दुचाकीधारकांना रविवारी सकाळी ९ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण हेल्मेट घालणे बंधनकारक आहे याची कृपया नोंद घ्यावी. आपण ऑनलाइन नोंदणी केली नसल्यास ६ मार्च रोजी ९ वाजता जागेवर नोंदणी करू शकता. (नोंदणी विनाशुल्क आहे). र्यान्डोम बाइकर्स, केटीएम अलिबाग, रॉयल एन्फिल्ड अलिबाग, रॉयल रायडर्स पोयनाड क्लब तसेच फ्रायडे फिल्म्स, पिनाक स्टुडीओ हे ग्रूप या रॅलीमध्ये सहभागी होऊन रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमास सहकार्य करणार आहेत.

हे एक चांगले समाजकार्य हाती घेतले आहे, याआधी मुरुडमध्ये अशा प्रकारची रॅली आयोजित केली होती. आता ६ मार्च रोजी अलिबाग आणि इथेच न थांबता आम्ही जिल्ह्यात तसेच राज्यभर शक्य होइल तितके हे जनजागृतीचे कार्य ‘बाइकर्स ऑफ मुरुड’ या क्लबद्वारे पुढे नेणार आहेत असे पीस्क्वेअर मुरुडचे अध्यक्ष प्रसाद चौलकर यांनी सांगितले.