28 February 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड: दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसाच्या लगावली कानशिलात

वाहतूक पोलीस तेजलाल हिरामण भालेराव हे वाकड येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास कर्तव्य बजावत होते, त्यावेळी...

संग्रहित छायाचित्र

विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या चालकाला दीड हजार रुपयांचा दंड केल्यामुळे वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत दुचाकी चालकाने पोलिसाच्या कानशिलात लगावल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस तेजलाल हिरामण भालेराव यांनी तक्रार दिली असून ,त्यानुसार संशयित आरोपी सुरज गोविंद परळकर वय-२८ याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहतूक पोलीस तेजलाल हिरामण भालेराव हे वाकड येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास कर्तव्य बजावत होते. त्यावेळी संशयित आरोपी सूरज गोविंद परळकर (वय-२८ रा.सायर वस्ती हिंजवडी) हा दुचाकीवरून विनाहेल्मेट जात होता. त्याला वाहतूक पोलीस तेजलाल यांनी अडवले आणि दीड हजार रुपयांची पावती दंड केली, तेव्हा त्यावरून दोघात वाद झाला. याच वादातून संशयित आरोपी सूरज याने वाहतूक पोलीस तेजलाल यांच्या कानशिलात लगावत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्यानुसार सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिसासोबत मारहाण, धमक्या देणे हे प्रकार वाढले आहेत. या घटनांमधून पोलिसांचा वचक आरोपींवर राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 11:56 am

Web Title: biker slapped traffic police in puness wakad
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ: धनंजय मुंडे
2 पोलीस आणि रिक्षाचालकाच्या प्रयत्नांमुळे महिलेला पंधरा तोळयांचे दागिने परत मिळाले
3 ‘आधार’शी असहकार?
Just Now!
X