28 November 2020

News Flash

पालघरमध्ये आता जिल्हा पक्ष्यांसाठी निवडणूक

जनजागृतीसाठी पक्षीप्रेमी संस्थांचा पुढाकार

जनजागृतीसाठी पक्षीप्रेमी संस्थांचा पुढाकार; जिल्हा मुख्यालयात माहिती-छायाचित्रे

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर :  सध्या दुर्मीळ झालेल्या पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यासाठी पालघरमधील पक्षिप्रेमी आणि शिवनेरी ग्रुपने जिल्ह्य़ात आढळणाऱ्या सात पक्ष्यांची लोकप्रियता अजमावण्यासाठी निवडणूक घेण्यात येईल. यामधून दोन पक्ष्यांची निवड करून त्यांची माहिती आणि छायाचित्र जिल्हा मुख्यालयात विविध ठिकाणी लावण्याचा मानस या समूहाचा आहे.

स्वत:च्या भागात जैवविविधतेचे रक्षण करणे कर्तव्य असून पक्ष्यांची निसर्गातील भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. अनेक पक्षी हे शेतकऱ्यांचे मित्र असून काही पक्षी धोक्याची सूचना देत असतात. जिल्ह्य़ात पूर्वी सहजपणे दिसणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण पक्ष्यांपैकी काही पक्षी कालांतराने दुर्मीळ झाले आहेत. नागरिकांमध्ये परिसरातील पक्ष्यांविषयी जनजागृती व प्रेम निर्माण व्हावे यासाठी शिवनेरी ग्रुपतर्फे अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. पालघर परिसरात आढळून येणाऱ्या तसेच निसर्गचक्रासाठी उपयुक्त करणारे व दुर्मीळ होऊ पाहणाऱ्या सात पक्ष्यांपैकी पालघर जिल्ह्य़ातील नागरिकांनी या अभिनव निवडणुकीत दोन पक्ष्यांना अग्रक्रम द्यायचा आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी समाजमाध्यमावरून संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार असल्याचा मानस पक्षिप्रेमी गजानन पाईकराव यांनी व्यक्त केला आहे.

लोकप्रिय सात पक्ष्यांची सूची

शखरशखरा (Sunbird)

आकाराने लहान, सुईसारखी लांब चोच व दिसायला सुंदर असणारा हा पक्षी परागीभवन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

सोन्या पक्षी (Golden Oriole Peelak)

स्थलांतरित पक्षी असला तरी सध्या सर्वत्र अधिवास आहे. देखण्या रूपाने प्रसिद्ध, हवामानाचा अचूक अंदाज सांगणारा हा पक्षी सर्वत्र आबादीचे लक्षण सांगतो.

सुतार पक्षी (The Hoopoe Hudhud)

सुंदर तुरा, धारदार चोच, रंगीबेरंगी पंख असलेला पक्षी दुर्मीळ आहे. हा पक्षी शेतकऱ्यांचे घडय़ाळ म्हणून ओळख आहे.

नीळकंठ (Blue Toy)

हा पक्षी दिसणे भाग्याचे लक्षण मानले जात असून नांगरणी, कोरपणीच्या वेळी जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या-किडे यांचे भक्षण करत असल्याने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो.

कनेहा बगळा (Green Bittern)

दिसायला आकर्षक असणारा हा पक्षी पाण्यातील लहान कीटकांचे भक्षण करून पाणी शुद्धीकरण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. पाण्यातील क्षार मर्यादित राखण्यास मदत होते.

वलगी (Spotted  Dove)

अंगावर काळे ठिपक्यांच्या गडदपणावरून पावसाचे प्रमाण दर्शविणारा हा पक्षी सुमधुर आवाजाने व देखण्या रूपाने आकर्षित करतो.

भारद्वाज (Crow Pheasant)

लाजाळू व डोक्यावरील रंगाने मोहक दिसणाऱ्या या पक्ष्याचे  धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हा पक्षी दुर्मीळ होत चालला असून त्याचे दर्शन शुभ मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:11 am

Web Title: bird loving organizations initiatives awareness about rare birds zws 70
Next Stories
1 पालिकेच्या पाणी करात तफावत
2 शहरबात : विनाशकारी गर्वगीत
3 नालासोपारा येथे १.५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Just Now!
X