माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांची आज ६२ वी जयंती. उमद्या, लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेता म्हणून आर. आर. पाटील यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. राज्यभरात ते आबा या टोपणनावाचे ओळखले जायचे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल

पूर्ण नाव – रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील

Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

जन्म – १६ ऑगस्ट १९५७
मृत्यू – १६ फेब्रुवारी २०१५

जन्मगाव – अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली

शिक्षण – बी.ए., एल.एल.बी.

राजकीय प्रवास –

१९७९ – १९७९ मध्ये सांगली जिल्ह्यातील सावळजमधून जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९७९ ते ९० या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले.

१९९० – तासगावचे आमदार म्हणून पहिल्यांदाच विधासभेत

१९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ असे सलग सहा वेळा ते तासगावचे आमदार झाले

१९९६ – विधानसभेमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले.

१९९८ – विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली

१९९६-९७ आणि १९९८-९९ या काळात त्यांनी विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षस्थानही भूषविले.

१९९९ – मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याच वर्षी त्यांची महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्रीपदी नियुक्ती

२००४ – एक नोव्हेंबर २००४ रोजी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

२००३ ते २००८ आणि २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणूनही काम सांभाळले.

२००८ – मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मंत्रिपद गमावलं

२००९ – दुसर्‍यांदा गृहमंत्रिपदी विराजमान

२००४ आणि २००९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भुषवलं

आबांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय – 

> राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले

> ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवले

> डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणीही केली

> डान्सबार बंदीच्या निर्णयावर अनेक स्तरांमधून टीका झाल्यानंतरही आबा आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिले.

> नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारले. या काळात त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध विकासकामे करून नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. आदिवासींच्या मुलांना दत्तक घेऊन मुख्य प्रवाहात आणले.

> गडचिरोलीमधील विकासकामांना त्यांच्या प्रयत्नांमुळे चालना मिळाली

आबांची गुणवैशिष्ट्ये – 

> राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य घरातून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली

> संवेदनशील राजकीय नेता अशी ओळख असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक

> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे पाठीराखे

> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वच्छ प्रतिमेचा सोज्ज्वळ चेहरा अशी आबांची ओळख होती

> तीन तपांहून अधिकच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर झाला नाही

> ते एक उत्कृष्ट वक्ता होते. त्यांना ग्रामीण महाराष्ट्रीची चांगली माहिती होती