22 January 2020

News Flash

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींकडून खास शुभेच्छा, म्हणाले..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक, धडाडीचे नेते आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. त्या वादातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही त्यांनी हजेरी लावली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा मुद्दा पुढे आपली वेगळी ताकद निर्माण करणाऱ्याच्या प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबतही शिष्टाई करत युती केली. या त्यांच्या सगळ्या राजकीय कौशल्याचे कौतुक याआधीही झाले आहे. आता त्यांच्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देवेंद्र फडणीस हे धडाडीचे नेते आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

First Published on July 22, 2019 9:34 am

Web Title: birthday greetings to the energetic and dynamic cm of maharashtra says pm narendra modi scj 81
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झाले नाही: साध्वी प्रज्ञा
3 इम्रान अमेरिकेत दाखल
Just Now!
X