News Flash

“इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी”

"शिवसेनेला विश्वास नसेल तर राममंदिराला दिलेलं एक कोटीचं दान परत घ्यावं"

"शिवसेनेला विश्वास नसेल तर राममंदिराला दिलेलं एक कोटीचं दान परत घ्यावं"

अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून कथित भ्रष्टाचावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उत्तर दिलं आहे. इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. विश्वास नसेल तर राममंदिराला दिलेलं एक कोटीचं दान परत घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

“शिवसेनेला विश्वास नसेल तर राममंदिराला दिलेलं एक कोटीचं दान परत घ्यावं पण राम मंदिराची बदनामी करु नये,” असं आचार्य तुषार भोसले म्हणाले आहेत. “शिवसेनेला इटालियन डोहाळे लागल्यामुळे आज ते राम मंदिराचीही बदनामी करत आहेत. कोणतीही अधिकृत माहिती न घेता संजय राऊत यांनी राममंदिराची बदनामी चालवली आहे,” असा आरोप यावेळी त्यांनी केला. तसंच ट्रस्टने पारदर्शक आणि बाजारभावानेच व्यवहार केला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“मोहन भागवतांनी खुलासा करावा,” राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावरुन संजय राऊतांचा संताप

अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्याने वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्रस्टकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून दुसरीकडे सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संजय राऊतांकडून खुलासा करण्याची मागणी

दरम्यान शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंबंधी भाष्य करत संताप व्यक्त केला आहे. तसंच याबाबत ट्रस्टसह सरसंघचालक मोहन भागवत यांनीही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“आपचे खासदार संजय सिंग यांनी माझ्याशी फोनवरुन चर्चा करुन माहिती दिली. प्रभू श्रीराम आणि अयोध्या आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. काही जणांनी त्याचं राजकारण केलं असेल पण आम्ही नाही. ट्रस्टचे सर्व सदस्य भाजपाच्या. सरकारच्या वतीने नेमण्यात आले आहेत. आमच्यासारख्या संघटनेचाही सदस्य असावा असं आम्ही सांगत होतं. पण त्यांनी तसं केलं नाही,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो तेव्हा राम मंदिराचं काम सुरु होतं. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी आपल्यातर्फे एक कोटींची रक्कम दिली होती. राम मंदिराच्या नावे देशभरातून निधी गोळा करण्यात आला. संपूर्ण जगातून शेकडो कोटींचा निधी राम मंदिरासाठी लोकांनी दिला आहे. प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा झाला नाही पाहिजे. पण जे जमिनीचं प्रकरण समोर आलं आहे त्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही,” असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

“दोन कोटींची जमीन दहा मिनिटांत १८ कोटींना कशी घेतली?”; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप

“जर हा घोटाळा झाला असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी सर्वांसमोर येऊन शंका दूर केली पाहिजे. सरकारच्या वतीने तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा. विश्व हिंदू परिषेदच्या नेत्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे. अयोध्येसाठी लढा देणाऱ्या आमच्यासारख्यांना नेमकं काय झालं आहे हे कळणं गरजेचं आहे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 5:29 pm

Web Title: bjp acharya tushar bhosale shivsena sanjay raut ram temple trust accusation of land scam sgy 87
Next Stories
1 “प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी, कारण …”; रामदास आठवलेंचा पवारांना खास सल्ला!
2 गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर अज्ञात युवकांकडून पाळत
3 Maratha Reservation: अजित पवार-शाहू महाराज भेटीवर छत्रपती संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….
Just Now!
X