04 March 2021

News Flash

लोकसभेची जागा न मिळाल्याने भाजपचे मित्रपक्ष नाराज

आठवले यांनी जाहीरपणेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपने लोकसभेसाठी काही जागा न सोडल्याने ते नाराज आहेत.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध शिवसेनेची नाराजी असल्याने रामदास आठवले यांनी आता या जागेसाठीही मोर्चेबांधणी केली असून दोन जागांची मागणी भाजपकडे केली आहे.

भाजपने शिवसेनेशी युती करून जागावाटप करताना मित्रपक्षांच्या पदरात काहीच टाकले नसल्याने ते नाराज आहेत. आठवले यांनी जाहीरपणेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली होती, पण ही जागा शिवसेनेकडे असून राहुल शेवाळे यांची ही जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता आठवले यांनी ईशान्य मुंबईच्या जागेची मागणी केली आहे. त्याचबरोबर सोलापूर, लातूर, रामटेक यांपैकी एक जागा द्यावी, अशी आठवले यांची मागणी आहे. जानकर यांच्या पक्षाने सहा जागांची मागणी केली असली तरी जानकर हे बारामती किंवा माढा येथून लढण्यास इच्छुक आहेत. भाजपवर नाराज असलेल्या मित्रपक्षांची सोमवारी बैठक झाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:03 am

Web Title: bjp allies parties disappointed after not getting lok sabha seat
Next Stories
1 राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार
2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस ७ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
3 दिल्लीत काँग्रेस उमेदवारांच्या नावांवर  चर्चा
Just Now!
X