पुणे जिल्ह्यातील भोर येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपाच्याच एका ४० वर्षीय महिला पदाधिकारीने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडमधील एका ४० वर्षीय भाजपा महिला पदाधिकारीने भोसरी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली आहे. मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाठवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत. तीन वर्षांपासून दोघांची ओळख होती, मात्र काल अचानक देशमाने यांनी व्हॉट्स अॅपवर एक अश्लील व्हिडीओ क्लिप पाठवली. दोघांची एका राजकीय कार्यक्रमात ओळख झाली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून दोघं फोनवर संपर्कात होते, त्यांचं बोलणं व्हायचं. मात्र रविवारी रात्री अचानक देशमाने यांनी भाजपा महिला पदाधिकारीच्या मोबाइलवर अश्लील विडिओ पाठवले. त्यानंतर संबंधित महिलेने देशमानेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.