News Flash

“पंढरपूरमधील पराभवानंतर अजित पवार राजीनामा देणार का?”

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजपा अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपाने बाजी मारली. अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस यश मिळवू शकली नाही. दरम्यान या पराभवानंतर अजित पवारांचा राजीनामा मागणार का? अशी विचारणा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“त्या पक्षाला उघडं पाडणार”; अदर पूनावाला प्रकरणावरुन आशिष शेलारांचा इशारा

पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी

पश्चिम बंगालमधली पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यासंबंधी बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, “अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेणे म्हणजे नवाब मलिक. मोफत लस म्हणून ते तोंडावर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये. तेच नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्या असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागणार का?”.

“पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात”, भाजपाची पहिली प्रतिक्रिया

नाना पटोलेंवर टीका –
“नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

पुनावाला प्रकरणावरुन इशारा
“अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नावं पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. आज यावर राजकारण करायचं नाही. करोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं,” असा इशारा आशिष शेलार यांनी यावेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 5:40 pm

Web Title: bjp ashish shelar on ncp nawab malik ajit pawar pandhapur by election sgy 87
Next Stories
1 “चंद्रकांतदादा, जामीनाबद्दल बोलायचं झालं तर भाजपाचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत”
2 देश जाणू इच्छित आहे अमित शाह राजीनामा कधी देणार?- नवाब मलिक
3 चंद्रपूर : वनविभागाच्या कार्यालय परिसरात शिरलं अस्वल; इंजेक्शन देऊन करण्यात आलं जेरबंद
Just Now!
X