News Flash

“तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय”

दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे म्हणणाऱ्या नाना पटोलेंना भाजपाचं उत्तर

BJP, Atul Bhatkhalkar, Congress, Nana Patole, PM Narendra Modi, Rahul Gandhi
दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे म्हणणाऱ्या नाना पटोलेंना भाजपाचं उत्तर (Photo: PTI)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे एवढंच आपल लक्ष्य आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकली असल्याची टीका केली आहे. दरम्यान नाना पटोलेंच्या या टीकेला भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे.

“दोन्ही दाढीवाल्यांचं शटर बंद करायचं एवढंच आपलं लक्ष्य”, नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा!

अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलं असून, “सध्या तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय ते पाहा,” असा टोला लगावत काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

नाना पटोलेंनी नेमकं काय म्हटलं –

पुण्यात काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. “केंद्र सरकारने ज्यावेळी देशात नोटबंदी आणली तेव्हा अनेक जण बँकेच्या रांगेत उभे राहिले. या रांगेत असंख्य निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पण त्याचदरम्यान गोव्यात एका कार्यक्रमात पंतप्रधान म्हणजेच आता नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला ५० दिवस द्या. जर नोटबंदी फसली, तर मला कोणत्याही चौकात आपण द्याल ती शिक्षा हा प्रधानसेवक घेण्यास तयार आहे. मग आता त्याचं काय झालं?” असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

“जर काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला, तर…”, जयंत पाटलांचा काँग्रेसला इशारा!

“खोटं बोल, पण रेटून बोल, असे लोक सत्तेमध्ये आले असून मागील सात वर्षांत जी व्यवस्था काँग्रेस पक्षाने उभी केली होती. ती सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाने मोडकळीस आणली”, असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी मोदींसोबत झालेल्या भांडणाविषयी सांगितलं. “नोटाबंदीनंतर, जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला गेला. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारेल असे सांगितले. पण माझ्या लक्षात आलं आणि त्याला मी विरोध केला. हे आमचे शेतकरी, मध्यमवर्गीय यांच्यासाठी नाही. हा तुमच्या मूठभर लोकांसाठी नोटबंदीसारखा कायदा आहे, असं मी सांगितलं. यावरून माझं आणि त्यांचं आमनेसामने भांडण झालं,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 9:36 am

Web Title: bjp atul bhatkhalkar on congress nana patole pm narendra modi rahul gandhi sgy 87
Next Stories
1 “चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं”
2 मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका
3 एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण
Just Now!
X