News Flash

बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? भाजपाचा सवाल

विधानसभेत आदित्य ठाकरेंना विचारणा

संग्रहित (फेसबुक)

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधक ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंवरील कारवाईच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक भूमिका घेत असून यामुळे सभागृहाचं कामकाज अनेकदा स्थगित करावं लागलं आहे. दरम्यान अधिवेशनात बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? असा सवाल भाजपाने विचारला आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाण साधला.

आणखी वाचा- रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?; नाना पटोलेंचा सवाल

ते म्हणाले की, “२००७ मध्ये बजाज कंपनीला २०० एकर जागा दिली असताना २०२० पर्यंत बजाज कंपनीने यासंदर्भात कुठलंही काम केलं नाही. एमआयडीसीने विलंबशुल्क म्हणून १४३ कोटी रुपये त्यांच्याकडे मागितले असतानापर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आणि १४३ कोटींच्या ऐवजी अवघे २५ कोटी घ्यायचे हा निर्णय झाला का?”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:17 pm

Web Title: bjp atul bhatkhalkar shivsena aditya thackeray bajaj company midc land sgy 87
Next Stories
1 जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प!; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना इशारा
2 सचिन वाझेंबद्दल ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय; गृहमंत्र्यांनी केली घोषणा
3 “कोण लागून गेला सचिन वाझे?,” विधानपरिषदेत प्रवीण दरेकर संतापले
Just Now!
X