News Flash

“जामीनावर सुटला आहात,” ममता बॅनर्जींचं कौतुक केल्याने चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा

"अन्यथा फार महागात पडेल"

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. दरम्यान छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचं कौतुक केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना थेट धमकीवजा इशाराच दिला आहे.

छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या. मै अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या. त्याचप्रमाणे ममतादीदीही मै अपना बंगाल नही दुंगी म्हणत लढल्या. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती”. “बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे आठ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान ममता बँनर्जींचं कौतुक केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना धमकीवजा इशारा दिला आहे. “छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी. कशाला बंगाल वैगेरे….जिथे आहात तिथा बोला ना…जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल,” असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. बोलायचंच असेल तर पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडूवर बोला असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 7:32 pm

Web Title: bjp chadrkant patil on ncp chhagan bhujbal west bengal assembly election result sgy 87
Next Stories
1 पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपाचे अवताडे विजयी; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का
3 West Bengal Election result 2021 : ममता बँनर्जी तर झाशीची राणी – छगन भुजबळ
Just Now!
X