News Flash

“अजित पवारांच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे योग्य नाही”, चंद्रकांत पाटलांची टीका

संभाव्य लॉकडाउनच्या निर्णयाला विरोध

अजित पवारांनी आता सर्व सोडून पुण्यात येऊन बसलं पाहिजे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. करोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचाकला आहे. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“करोनाचं वाढचं प्रमाण रोखण्यासाठी लोकांचं बाहेर फिरणं, एकमेकांना भेटणं बंद केलं पाहिजे. लॉकडाउनची गरज आहे हे योग्य असलं तरी त्यानंतर लोकांचे जे हाल होणार आहे त्याची काळजी करायची की नाही. तुटपुंज पॅकेज द्यायचं आणि तेदेखील अजून हातात पडलेलं नाही,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

“रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची पूर्ण व्यवस्था केल्याशिवाय लॉकडाउन करुन काय करणार आहात? पुण्यातील १० रुग्णालयांना ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना हलवावं लागलं. अजित पवारांनी आता सर्व सोडून पुण्यात येऊन बसलं पाहिजे. पालकमंत्री २४ तास छडी घेऊन बसला पाहिजे. काही पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात ४० हजार रेमडेसिवीर नेत आहेत आणि पुणे शहराला फक्त ७००….अजित पवारांच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे योग्य नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सर्व पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातून अजिबात हलू नका असं सांगितलं पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:52 pm

Web Title: bjp chandrakant patil on maharashtra deputy cm ajit pawar coronavirus covid 19 lockdown sgy 87
Next Stories
1 गंभीर घटना! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू
2 …मग २०२२ला येणारा कुंभमेळा २०२१मध्ये का घेतला?; आव्हाडांनी उपस्थित केली शंका
3 “नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत,” आचार्य तुषार भोसलेंची टीका
Just Now!
X