X

शरद पवारांना छोटे नेते म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

"पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं..."

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना छोटे नेते म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते वक्तव्य व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, तर सर्वांबद्दल होतं असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच आपण शरद पवारांवर पीएचडी करत असल्याचं ते म्हणाले आहेत. शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.

“शेती, साखर या गोष्टीत शरद पवारांचा आहे तितका अभ्यास कुणाचा नाही. शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले,” असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. “राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

आणखी वाचा- शरद पवार कमी उंचीचे नेते?, उद्धव ठाकरे म्हणतात…

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “उद्धव ठाकरेंचा अभ्यास नाही. त्यांना कामकाजाची माहिती नाही. मंत्रालय कुठे आहे, हेदेखील त्यांना माहिती नव्हतं. शरद पवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या नावाचा नावाचा प्रस्ताव ठेवला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी आमदार, नगरसेवक होते. मीदेखील रात्री तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचो. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी अभ्यास केला. उद्दव ठाकरेंना विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली नाहीत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “ठाकरे सरकार पडलं तर…,” सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ईडी चौकशीवरुन होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिलं. “ईडी वाढीव संपत्ती आणि मनी लॉण्ड्रिंगची चौकशी करतं. तुम्हाला माणसं टिकवता येत नाहीत, हे मान्य करावं,” असं त्यांनी म्हटलं आहे.

23
READ IN APP
X