News Flash

“इंधन दरवाढीवरुन केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारने आपला कर कमी करावा”, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

देशामध्ये सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये तर पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी इंधन दरवाढीवरुन सरकारवर टीका केली आहे. (संग्रहित छायाचित्र)

इंधन दरवाढीप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला चांगलंच सुनावलं आहे. इंधन दरवाढ झाली म्हणून सरसकट केंद्राकडे बोट दाखवणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. राज्यासह देशातही काही ठिकाणी इंधनाचे भाव गगनाला भिडलेले आहेत.

इंधन दरवाढीवरुन राज्य सरकार केंद्राला जबाबदार धरत आहे हे चुकीचं आहे. त्याचसोबत राज्याने केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आपला कर कमी करावा म्हणजे इंधनाचे दर कमी होतील असा सल्लाही पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्यासह देशातल्या अनेक भागात पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दरांत लिटरला २१ पैशांची, तर डिझेलच्या दरांत लिटरमागे २० पैशांनी वाढ करण्यात आल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. ४ मेपासून विसाव्यांदा करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे देशभरातील इंधनाच्या दरांनी ऐतिहासिक विक्रम केला आहे.

आणखी वाचा- देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोल आता शंभरीपार पोहचले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे लिटरला ९५.०९ रुपये, तर डिझेलचे दर लिटरमागे ८६.०१ रुपये झाले आहेत. पेट्रोल लिटरला १०० रुपयांहून अधिक दराने विकले जात असलेले मुंबई हे २९ मे रोजी देशातील पहिले महानगर ठरले होते.

मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला १०१.३ रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे ९३.३५ रुपये मोजावे लागत आहेत. तर पुण्यामध्ये शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरात अजून आज अजून वाढ झाली आहे. पुण्यात सध्या पेट्रोल १०१.१८ रुपये तर पॉवर पेट्रोल १०४.८७ रुपये लीटर झालं आहे. तर डिझेलची प्रतिलीटर किंमत ९१.८२ रुपये झाली आहे.

आणखी वाचा- Photos: मोदी म्हणजे महागाईचा भस्मासूर… इंधन दरवाढीविरोधात पुण्यात आंदोलन

इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसने आज आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल दरवाढ रद्द करण्यासंदर्भातही जोरदार घोषणाबाजी बराच वेळ सुरु होती. अनेक काँग्रेस पदाधिकारी पेट्रोल पंपासमोर घोडागाडीमध्ये बसून घोषणा देत होते. एका बॅनरमध्ये तर मोदींचा चेहरा लावून महागाईचा भस्मासूर असं लिहिण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 1:13 pm

Web Title: bjp chandrakant patil on petrol diesel hike state government should reduce their taxes vsk 98
Next Stories
1 “नाराजांची संख्या वाढू नये…,” ठाकरे सरकार पाडण्याच्या वक्तव्यांवर खडसेंची प्रतिक्रिया
2 फडणवीसांनी जळगावमधील घरी भेट दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 ‘ब्लू टीक’वरून नवाब मलिकांनी मोदी सरकारला लगावला टोला; म्हणाले…
Just Now!
X