News Flash

जातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण

युती सरकार महापुरुषांच्या नावाचा वापर करून केवळ विकासकामांची घोषणाबाजी करीत आहे.

ग्रंथालय इमारत भूमिपूजनप्रसंगी  अशोक चव्हाण, राजीव सातव, शीला भवरे आदी.  (छाया- नागेश चव्हाण, वसमत)

हिंगोली : चार वर्षांच्या कार्यकाळात केवळ घोषणाबाजी; आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मते मिळवण्यासाठी जातीय तेढ निर्माण करून समाजात दंगली घडवण्याचे भाजपाचे षड्यंत्र दिसून येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक  चव्हाण यांनी केला.  वसमत येथे खासदार सातव यांच्या स्थानिक विकास निधीतून नांदेड रोडवरील आंबेडकर चौक येथील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते  झाले, या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार राजीव सातव, नांदेड मनपाच्या महापौर शीला भवरें, अ.हफीज अ.रहेमान, शिवदास बोडेवार, सुनील काळे, अमर खानापुरे, संजय बोंढारे, सीमा हफीज़्‍ा आदींची उपस्थिती होती.  युती सरकार महापुरुषांच्या नावाचा वापर करून केवळ विकासकामांची घोषणाबाजी करीत आहे. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक कामाचे उद्घाटन झाले व अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दोन वर्षांंपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी अद्याप हे काम सुरू झाले नाही, असे म्हणत चव्हाण यांनी सरकारवर टीका केली.  केंद्र व राज्य शासनाच्या भूलथापांना जनता वैतागली असल्याचे सांगून त्यांनी ‘जो सरकार निक्कमी है वो सरकार बदलनी है’ अशी वेळ आल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:46 am

Web Title: bjp conspiracy to increase communal division says ashok chavan
Next Stories
1 सरसकट मावेजाची काँग्रेसची मागणी गडकरी, फडणवीस यांना मान्य
2 जयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर
3 भयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट
Just Now!
X