20 September 2020

News Flash

भाजपा नगरसेविकेचा विनयभंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

निगडी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

भाजपा महिला नगरसेविकेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. नगरसेविकेच्या अंगावर गाडी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक काळे असं आरोपीचे नाव असून आणखी एक अनोळखी आरोपी त्याच्यासोबत होता. ही घटना शहरातील भक्ती-शक्ती चौकात शुक्रवारी घडला आहे. संबंधित भाजपा नगरसेविका आणि त्यांचे पती हे भक्ती-शक्ती चौकातून मोटारीने जात असताना फॉर्च्युनर गाडी ने कट मारून पीडित नगर सेविकेच्या गाडीला फॉर्च्युनर आडवी लावून नगरसेविकेच्या हाताला धरून खाली खेचत कानशिलात लगावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित भाजपा महिला नगरसेवक आणि त्यांचे पती हे मोटारीतून चिंचवडला मुलीला भेटण्यासाठी जात होते. तेव्हा, भक्ती शक्ती चौकातून वळणावर यू टर्न घेत असताना आरोपी यांची फॉर्च्युनर ने कट मारून पीडित नगरसेविकेच्या गाडीला आडवी लावली. त्यानंतर अनोळखी आरोपीने त्यांना गाडीतून हाताला धरून खेचत ढकलून दिले. त्यानंतर तू माझ्या मालकाची तक्रार पोलिसात दिली अस म्हणून त्यांच्या कानशीलात लगावली. तसेच अश्लील  वर्तन केले असं फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, अशोक काळे याने नगरसेविकेच्या अंगावर गाडी घाल म्हणून अश्लील इशारे केले. त्यानंतर अनोळखी आरोपीने त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा पर्यंत केला. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 12:40 pm

Web Title: bjp corporators molestation and attempt to kill her scj 81
Next Stories
1 फुकटची प्रसिद्धी मिळविण्यासाठी वस्तू वाटप होणारच..
2 भाजे धबधब्याकडे जाणारा मार्ग शनिवार, रविवार बंद
3 मुंबई पालिकेच्या गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात उचलत आहेत कचरा!
Just Now!
X