News Flash

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

जळगाव दौऱ्यात फडणवीस पोहोचले एकनाथ खडसेंच्या घरी

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी गिरीश महाजनदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

जशास तसं! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.

एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडत असल्याचा आरोप केला होता. भाजपा सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान फडणवीस यांनीदेखील खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे अशा परिस्थितीतही फडणवीस यांनी खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 12:06 pm

Web Title: bjp devendra fadanvis girish mahajan jalgaon ncp eknath khadse raksha khadse sgy 87
Next Stories
1 आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहतील; चंद्रकांत पाटलांचा टोला
2 शरद पवार – फडणवीस भेटीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 “हे बरं झालं… खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारला आठवण करून दिली”
Just Now!
X