28 January 2021

News Flash

“सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालासुद्धा ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

"एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारे"

संग्रहित छायाचित्र

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. ठाकरे सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर विरोधक नाराजी व्यक्त करत असून टीका करत आहेत. दरम्यान शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत असं ते म्हणाले आहेत. त्यांनाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

‘कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने,’ मुंबई हायकोर्टाचा महापालिकेला दणका

मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन महापालिकेला फटकारलं असून दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी अटकेवरुन ठाकरे सरकारला फटकारलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?”.

आणखी वाचा- …या कारणामुळं अर्णब गोस्वामींना जामीन दिला; सर्वोच्च न्यायालयाचा खुलासा

“आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का,हा प्रश्न निर्माण होतो,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे,” असंही ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 1:07 pm

Web Title: bjp devendra fadanvis on maharashtra government supreme court high court sgy 87
Next Stories
1 “माझ्या आजीला असं वाटायचं की…”; उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा संदर्भ देत सांगितली ‘ती’ आठवण
2 “जनतेने बहुमत दिलेलं नसतानाही…,” पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
3 सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका : उद्धव ठाकरे
Just Now!
X