लसींचा तुटवडा असल्याने सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. लस उपलब्ध होत नसल्याने अनेक लसीकरणं केंद्र बंद ठेवण्याचे वेळ प्रशासनावर आली असताना सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या फोटोची चर्चा रंगली होती. यामध्ये तन्मय फडणवीस लसीचा डोस घेताना दिसत आहे. सध्या देशभरात ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…तर मग तन्मय फडणवीसला लस दिलीच कशी काय गेली?”

पुतण्यामुळे आता फडणवीस अडचणीत?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस यांनी करोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये असं म्हटलं आहे.

तन्मय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे”.

“पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

रुग्णालयाचं स्पष्टीकरण
तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. वाद झाल्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. दरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, “तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis on tanmay fadnavis controversy over vaccination sgy
First published on: 20-04-2021 at 11:29 IST