अमरावती : माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये स्वगृही पतरल्यानंतर निर्माण झालेली पोकळी लगेच भरून निघणार नसली, तरी भाजपने जिल्ह्य़ातील काही जुन्या काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी हालचाली गतिमान के ल्या आहेत. सोमवारी अचलपूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते नानासाहेब बोबडे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. जिल्ह्य़ातील अनेक काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर असून भाजपची स्थिती अधिक मजबूत होणार असल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी के ला आहे.

अचलपूर पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब बोबडे यांनी सोमवारी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष निवेदिता  चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश के ला. यावेळी माजी आमदार रमेश बुंदिले, अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष लक्ष्मीकांत लाडोळे, जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीष मेन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अर्चना पखान आदी उपस्थित होते.

sangli lok sabha marathi news, sangli bjp lok sabha marathi news
सांगलीत विरोधकांमधील फूट भाजपच्या पथ्थ्यावरच
Congress, shetkari kamgar paksh
रायगडमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?
Major office bearers of Congress in Buldhana Lok Sabha constituency tendered their collective resignations
बुलढाणा: काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे… ‘हे’ आहे कारण…

डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपमध्ये स्वत:चा गट तयार के ला होता. जिल्ह्य़ातील भाजपच्या राजकारणात त्यांनी फारसा कधी हस्तक्षेप के ला नाही, पण अमरावती महापालिके च्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांना अखेरच्या काळात मंत्रिपद मिळाले, त्याआधी त्यांनी जिल्ह्य़ातील राजकारणावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न के ला. जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांचाही स्वतंत्र गट कार्यरत आहे. याशिवाय भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय आदी अनेक स्थानिक नेत्यांच्या गटातटांमध्ये विभागलेल्या भाजपमध्ये आता अस्वस्थता आहे.

२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता टिकवण्यात यश मिळवले होते. सर्वाधिक २७ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. सत्ता स्थापनेसाठी मात्र त्यांना सहकारी पक्षाची गरज भासली.

कोणत्याही बडय़ा नेत्याविना प्रचारात उतरलेल्या काँग्रेसने प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले होते. एकूण ५९ सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेसला २७, भाजपला १४, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, शिवसेनेला २, प्रहारला ४, बसप आणि रिपाइं आठवले गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. ५ ठिकाणी इतर उमेदवार निवडून आले होते. नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ग्रामीण भागावरही अधिक लक्ष केंद्रित केले होते. पण त्यांना यश मिळू शकले नव्हते. तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला होता. महापालिका आणि नगरपालिकांमध्ये वर्चस्व असूनही जिल्हा परिषदेत मात्र सत्तेपासून वंचित असल्याची खंत भाजप वर्तुळाला अजूनही आहे. आता ग्रामीण भागातील काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने हालचाली सुरू के ल्या आहेत.