28 January 2020

News Flash

उद्धव ठाकरेंनी मान्य केली एकनाथ खडसेंची ‘ही’ मागणी

एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत जवळपास अर्ध्या तासाहून जास्त वेळ चर्चा केली

एकनाथ खडसे भाजपात नाराज असून शिवसेनेत प्रवेश करणार असे तर्क-वितर्क गेले काही दिवस लढवले जात आहेत. यादरम्यान एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र एकनाथ खडसे यांनी भेटीनंतर स्पष्टीकरण देताना आपण नाराज असल्याची चर्चा चुकीची असून पक्षांतराचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

या भेटीदरम्यान एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंकडे आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला असल्याचं सांगितलं. “गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबाद येथे उभं राहावं यासाठी आपण जमीन उपलब्ध करुन दिली होती. मात्र स्मारक अद्याप उभं राहू शकलेलं नाही. या स्मारकासाठी जास्त नाही ३० ते ४० कोटींचा खर्च आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या माध्यमातून घोषणा व्हावी,” अशी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

“उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. आम्ही प्राधान्याने स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसंच आवश्यकता असेल तर तिथला दौरा असेल त्यावेळी जागेला भेट देऊ असंही ते म्हणाले आहेत,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

यावेळी त्यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचं सांगितलं. “काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यामधील नेत्यांशी जवळीक आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आल्यास आपल्याला फायदा होईल असं त्यांना वाटत असावं. पण याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

First Published on December 10, 2019 8:15 pm

Web Title: bjp eknath khadse shivsena cm uddhav thackeray gopinath munde sgy 87
Next Stories
1 यंदाचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता : फडणवीस
2 मी नाराज असल्याची बातमी चुकीची – एकनाथ खडसे
3 CAB : काँग्रेसच्या दबावापोटी शिवसेनेने भूमिका बदलली? -फडणवीस
Just Now!
X