07 March 2021

News Flash

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, बारामतीपासून करणार सुरुवात

तीन दिवसांत ९ जिल्ह्यांना भेट देणार

संग्रहीत छायाचित्र

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. १९ ऑक्टोबरपासून त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ होईल.

आणखी वाचा- शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार

सोमवारी देवेंद्र फडणवीस बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, मंगळवारी (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी बुधवारी (२१ ऑक्टोबर) हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास फडणवीस करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:05 pm

Web Title: bjp ex cm devendra fadnavis tour of the heavy rain area nck 90
Next Stories
1 जीवावर उदार होऊन मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत; ऊर्जामंत्र्यांनी व्हिडीओ शेअर करत केला कर्मचाऱ्यांना सलाम
2 शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार
3 महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी – अनिल देशमुख
Just Now!
X