28 October 2020

News Flash

‘ई-पास’ बंद करण्यासाठी राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका

दलालांची मोठी टोळी ई-पासच्या गोंधळात सक्रिय असल्याचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

“सध्या राज्यभर ई-पासचा गोंधळ सुरु आहे. प्रवासासाठी ई-पास सक्तीचा आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना ई पास मिळत नाही आणि एजन्ट मार्फत गेले तर लागेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून  नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने हि ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी”, अशी विनंती करणारी जनहित याचिका आज (बुधवारी) भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी राज्य सरकारविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

“गेले काही महिने सर्वसामान्य जनतेला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहनाने प्रवास करण्यासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. परंतु अनेक वेळा मेडिकल इमर्जन्सी, नातेवाईकांचे मयत, व्यावसायिक मीटिंग अशी अत्यावश्यक कारणे देऊन सुद्धा ई-पास मिळत नाही. कधी एखाद्या सध्या क्षुल्लक कारणासाठी पास मिळतो, कधी तसाच पडून राहतो तर काही फालतू कारण देऊन रिजेक्ट केला जातो. ईपास मान्य किंवा अमान्य करण्यासाठी सिस्टम मध्ये कोणताही योग्य समन्वय नाही”, असे दिसून आल्याचे मत मयुरेश जोशी मांडले.

ते पुढे म्हणाले की ई-पासच्या या गोंधळात दलालांची एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. यासाठी सोशल मीडिया वर या लोकांनी चक्क जाहिराती दिल्या आहेत, आणि १००० ते ५००० रुपये घेऊन हे दलाल लोक तुमचा पास दुसऱ्या दिवशी आणून देतात. सामान्य माणसाला पास मिळत नाही, मग एजंटला कसा काय मिळतो? हे दलालांचे मोठे रॅकेट असून राज्य सरकारमधील कोणत्यातरी मोठ्या मंत्र्यांचा यासाठी राजाश्रय आहे का?, असे सवाल त्यांनी उपस्थित केला.

“गणेशोत्सव तोंडावर आहे. लोकांना कोकणात किंवा त्यांच्या गावाला जायचे आहे. त्यात रोज नवीन गोंधळ निर्माण करणारे आदेश राज्य सरकारमार्फत काढले जात आहेत. या प्रकरणात भाजपाच्या अनेक आमदारांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात अनेक वेळा पत्रे लिहिली आहेत, परंतु कोणालाच उत्तर मिळाले नाही. शेवटी जनतेला या ई-पासच्या त्रासातून सुटका करून देण्यासाठी ठाकरे सरकारविरुद्ध आम्हाला आता कायदेशीर लढाई लढावी लागत आहे”, असे मयुरेश जोशी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 7:48 pm

Web Title: bjp files pil in high court against thackeray government requests to block e pass for travelling vjb 91
Next Stories
1 देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत चंद्रपूरची झेप
2 महाराष्ट्रात ‘ट्रान्सफर मंत्रालय’- चंद्रकांत पाटील यांचा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा
3 “वाट लागल्यावर मराठी माणूस आठवतो”; ‘सामना’ अग्रलेखावरुन राणेंची खोचक टीका
Just Now!
X