27 September 2020

News Flash

शरद पवारांचीही गणना बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का? – गणेश नाईक

जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करताना मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही असा टोला लगावला होता

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात गेलेले गणेश नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसंच राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करताना मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही असा टोला लगावला होता. आता त्यावर गणेश नाईक यांनी उत्तर दिलं असून पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल विचारला आहे.

गणेश नाईक यांनी म्हटलं आहे की, “जनता, विकास आणि स्वाभिमान यासाठी आपण पक्ष बदलले आहेत. मुद्दामून आणि एकाएकी कोणी पक्ष बदलत नाही. याआधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्ष बदलला आहे. मग त्यांचीही गणना तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?”. त्यावेळी गरज असते म्हणून पक्ष बदलले जातात. त्यामुळे खालील स्तरावर जाऊन टीका केली जाऊ नये असंही गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.

काय बोलले होते जितेंद्र आव्हाड –
गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही असं म्हटलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं की, “मी एकदा नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथकल्लीच सुरु केली आहे. अजून शंभरवेळा मी जाणार आहे. त्यानंतर माझा बापदेखील येईल. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही”. गणेश नाईक यांच्या फिल्मी स्टाइल टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी, “मी स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो,” असं म्हटलं.

त्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाणे जिल्ह्य़ात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप केला होता. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, अशी टीकाही आव्हाड यांनी केली होती. नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ आदी शहरात पक्षाची ताकद संपली असे शरद पवार यांच्या निदर्शनास आणले होते. मात्र पवार यांचा माझ्यापेक्षा जास्त नाईक यांच्यावर विश्वास होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

गणेश नाईक यांनी काय टीका केली होती?
जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. “कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असं गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं होतं. गणेश नाईक यांनी यावेळी आपण मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याचंही ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2020 2:20 pm

Web Title: bjp ganesh naik ncp jitendra awhad sharad pawar navi mumbai municipal corporation sgy 87
Next Stories
1 करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी पंकजा मुंडेंनी सांगितला उपाय, म्हणाल्या…
2 धक्कादायक! मुलाने संपवलं अख्खं कुटुंब, वृद्ध आई-वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या
3 “मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झालं तर….”, धनजंय मुंडेंनी दिलं उत्तर
Just Now!
X