News Flash

सरकारकडून मेंटल टॉर्चर; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे

संग्रहित छायाचित्र

लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आवाज सरकारकडून दाबला जातो आहे. त्याचप्रमाणे मेंटली टॉर्चरही केलं जातं आहे असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. इतकंच नाही तर ” माझ्यावर कितीही गुन्हे नोंदवा मी गोरगरीबांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी लढा देणारच ” असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. ” सत्ताधारी आम्हाला मेंटल टॉर्चर करत आहेत. मात्र या गोष्टी आम्ही जुमानणार नाही लढा देणारच” असंही त्या म्हणाल्या आहेत.

आमचा लढा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही लढतो आहोत असंही प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं. प्रणिती शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला आणि हे सरकार मेंटल टॉर्चर करत असल्याचा आरोप केला. पुढचे दोन दिवस त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापुरात मागील वर्षी म्हणजेच २०१८ जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सरकारी रुग्णालयात महाग झालेल्या वैद्यकीय उपचारांची दरवाढ रद्द करा अशी घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला होता.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा घेराव घातला होता आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसोबत धक्काबुक्कीही केली होती. या धक्काबुक्कीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह ९ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने प्रणिती शिंदे यांना सदर बाजार पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितलं आहे. त्यानुसार आज त्या सदर बाजार पोलीस ठाण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. आता या टीकेला सरकारकडून काही उत्तर दिलं जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 7:04 pm

Web Title: bjp government mentally torturing opposition leaders says congress mla praniti shinde scj 81
Next Stories
1 मराठी माणसावर हात उचलला म्हणून मनसेने गुजराती व्यक्तीला शिकवला धडा
2 आमच्या जातीला आरक्षण नाही ते बरं आहे, नाहीतर मी… : गडकरी
3 शरद पवारांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली; उदयनराजेंचा आरोप
Just Now!
X