News Flash

नागोठणे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

रोहा तालुक्यामधील नागोठणे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. हेदवली येथील पूल तातडीने बांधावा

रोहा तालुक्यामधील नागोठणे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. हेदवली येथील पूल तातडीने बांधावा, या मागणीसाठी भाजपचे माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे रायगड जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
हेदवली येथील पूल पडून तीन वष्रे झाली तरी तो अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. येथील जनतेचे हाल होत आहेत.
त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. ऐनघर ते तामसोली, वरवठणे एमआयडीसी माग्रे सुप्रिम कॉलनीकडून वांगणी गावापर्यंत जाणारा रस्ता. आमडोशीकडे जाणारा रस्ता ह्य़ा रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या नागोठणे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे सर्व रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अशी उपोषकर्त्यांची मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2016 1:40 am

Web Title: bjp hunger strike about road repairs
टॅग : Bjp
Next Stories
1 रायगड जिल्ह्य़ातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या
2 लिम्काबुकमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची दखल
3 आरोपांना योग्य वेळी सडेतोड उत्तर – धनंजय मुंडे
Just Now!
X