News Flash

“उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईकांना वाचवत आहेत का?”

प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर सक्तवसुली संचलनालयाच्या पथकाने तपास केला

संग्रहित

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) पथकाने तपास केला. अत्यंत गुप्तता राखण्यात आलेल्या या तपास प्रक्रियेत बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज पथकाने ताब्यात घेतले. तसंच काही कागदपत्रंही ताब्यात घेण्यात आली. लोणावळा ग्रामीण पोलिसांना या तपासाबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे काही कारवाई ईडीने केली आहे की सीबीआयने याबाबत संभ्रम होता.

प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईकांना वाचवत आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

“शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईक ना वाचवितात? लपवितात? ठाणे भायंदरचे मतदार कोविडच्या काळात आमदार कुठे गायब झाले विचारत आहेत?,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

लोणावळ्यातील कुणेगाव परिसरात प्रताप सरनाईक यांचा बंगला आहे. बेहिशेभी मालमत्ता प्रकरणात ईडी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून सरनाईक यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी सरनाईक यांच्या लोणावळ्यातील फार्म हाऊसवर ईडीचे चौकशी पथक धडकलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 4:31 pm

Web Title: bjp kirit somaiya on shivsena pratap sarnaik ed maharashtra cm uddhav thackeray sgy 87
Next Stories
1 पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे; ठाकरे सरकारचा निर्णय
2 “निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता…”, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी!
3 “गडकरींनी सांगूनही राजकारण करण्याची हौस फिटत नाही”; रोहित पवारांची भाजपावर टीका
Just Now!
X